Tarun Bharat

कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या नगरप्रदक्षिणावर निर्बंध

Advertisements

प्रतिनिधी / पंढरपूर

आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. अशातच पंढरपुरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. सदरचा रुग्ण प्रदक्षिणा मार्गावर वास्तव्यास असल्याने एकादशी दिवशी संतांच्या पादुकासह मोजक्या वारकऱ्यांना नगरप्रदक्षिणा करण्यास निर्बंध येऊ शकतात.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रदक्षिणा मार्गावर राहणारा एका व्यक्तीचे तीन दिवसापूर्वी कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्याच्या निवासस्थानाचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास आता सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे सदरचा कोरोना रुग्ण हा प्रदक्षिणा मार्गावर येत आहे. आजपासून तीन दिवसांनी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरीत रंगेल. एकादशीला संतांच्या पादुकासह वारकरी हे नगरप्रदक्षिणा करीत असतात. सद्यस्थितीला नगर प्रदक्षणा परिसर हा कोरोना रोगामुळे प्रतिबंधित क्षेत्र होऊ शकतो. अशावेळी वारकऱ्यांना अन संतांच्या पादुकांना देखील एकादशी दिवशीची नगरप्रदक्षिणा करता येईल का ? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

एकंदर पाहिले तर, निश्चितच आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्ण आढळल्याने पंढरपुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण परगावाहून अनेक वारकरी एकादशीच्या निमित्ताने पंढरी येण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे. यामध्येच आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आषाढीत आरोग्यसंपन्न पंढरपूर रहावे. या दृष्टीने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

Related Stories

संचारबंदी : बाहेर फिरणा-या नागरीकांच्या कपाळी वारकरी ‘बुक्का’

Abhijeet Shinde

‘का’विरोधी आंदोलकांविरुद्ध खासदारपुत्राची तक्रार

prashant_c

स्वारद फाउंडेशनच्यावतीने दररोज ५०० लोकांकरीता अन्नवाटप सेवा

Rohan_P

आमदार भारत भालके अनंतात विलीन

Abhijeet Shinde

पुणे विभागात 30 हजार 508 क्विंटल अन्नधान्याची, तर 14 हजार 63 क्विंटल भाजीपाल्याची आवक

prashant_c

मराठा आरक्षण : राज्याची पुनर्विचार याचिका २४ रोजी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!