Tarun Bharat

कोरोनामुळे गणेशोत्सवात रस्ते सुनेसुने

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक आणि गणेशोत्सव मिरवणूक ही पारंपरिक आणि अभूतपूर्व पध्दतीने साजरी करण्यात येते. यावषी सण उत्सवावर कोरोनाचे संकट पसरले आहे. याला आता गणेश चतुर्थीही अपवाद नाही. गणेशदर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी बेळगावमधील रस्त्यांवर दिसून येते. मात्र यावषी गर्दी गायब झाली असून कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक बाहेर पडण्यास धजत नाहीत. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीही कमी झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सुरक्षित अंतर आणि कोरोना नियमांचे पालन करुनच सर्वजण गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देतानाचे चित्र दिसून येत आहे.

वाहतुकीची कोंडी ही बेळगावकरांची नेहमीचीच डोके दुखी आहे. दररोज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहन चालक, पादचारी अक्षरशः वैतागतात. श्रावण सुरु झाला की सण उत्सवांना उधाण येते. त्यामुळे दरवषीच सणांना सुरुवात होताच गर्दीचा महापूरच बेळगावमधील रस्त्यांवर दिसून येतो. परंतु यावषी सुरुवातीपासूनच कोरोनाचे संकट पसरले आहे. श्रावणमधील सोमवार असो किंवा गुरुवार, शुक्रवार आणि गणेशोत्सव या सणांना हमखास कोंडीची समस्या निर्माण होतेच. मात्र यावषी कोरोनाच्या धास्तीमुळे सर्व सण आणि उत्सवांवर विरजन पडले आहे. त्यामुळे शहरात होणारी गर्दी गायब असल्याचे चित्र सध्या दिसून येते.

शहराचा वाढता पसारा आणि बाहेरुन येणाऱया वाहनांची संख्या अधिक झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीचेच राहिल्यामुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी होताना दिसू लागली आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र अनेक रस्ते अर्धवट असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही. कायमस्वरुपी ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे नियोजन करणे गरजेचे वारंवार व्यक्त करण्यात येते. मात्र यावषी कोरोनाच्या भितीमुळे पोलिसांनीही काही प्रमाणात वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

सण उत्सव काळात रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चक्क होमगार्डंना नियुक्त करत होते. मात्र आता तशी परिस्थिती शहर आणि परिसरात दिसून येत नाही. महत्वाचे म्हणजे शहराबरोबरच उपनगरातही गणेश दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक गर्दी करत होते. यावषी सर्वत्रच गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यावर भर देण्यात आल्याने काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. यावषी कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अनेकांनी साध्या पध्दतीनेच सण उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे होणारी गर्दी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

आता सणाला सुरुवात झाली आहे. यामुळे मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी उसळल्याचे चित्र सर्रास आपणाला पहवायास मिळते. यामध्ये काही अवजड वाहने घुसविण्याचा प्रयत्न झाला तर चक्काजामचा अनुभव सर्रास अनुभवावयास मिळतो. मात्र यावषी हा सारा प्रकार घडत नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात कोंडी होते. मात्र तसे पाहता म्हणावा तसा गर्दीचा सामना कोरोनामुळे दिसून येतो.

फेरीवाले आणि भाजी विक्रेते भर रस्त्यावरच ठाण मांडून आपला व्यवसाय करताना दिसत असले तरी ते खरेदी करण्यासाठी नागरिकच घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येते. याचबराब्sार रिक्षा चालक प्रवाशांची वाट पाहत रस्त्यावरच थांबतानाचे चित्र दुरापास्त झाले आहे. तेंव्हा गणरायांकडे अनेकजण पुन्हा बेळगावातील रस्ते गजबजू दे आणि कोरोना सारख्या महामारीतून आमची सुटका कर, अशीच मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

होसकेरी चेकपोस्टवर 6 लाख रुपये जप्त

Amit Kulkarni

आरोग्य स्वच्छतेविषयी जागरुकता कार्यक्रम

Patil_p

होमगार्ड कार्यालयावर हल्ला करणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni

बेळगावमधील हॉटेल्सना १ लाख १४ हजार रुपये दंड

Sandeep Gawade

मोटारसायकल चोरीप्रकरणी दोघा जणांना अटक

Omkar B

शिक्षक भरतीत मराठीला प्राध्यान्य द्या!

Amit Kulkarni