Tarun Bharat

कोरोनामुळे दिवसभरात 11 जणांना मृत्यू

मृत्यूची संख्या वाढतीच, नवे 457 रुग्ण

प्रतिनिधी/ पणजी

कोरोनामुळे राज्यात सध्या मृत्यूचे थैमान सुरू आहे. काल मंगळवारी राज्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. कोरोनामुळे काल तब्बल 11 जणांना मृत्यू आला. मागील पाच दिवसात तब्बल 44 जणांना कोरोनामुळे मृत्यू आला आहे. काल नव्याने 457 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 4499 झाली आहे, तर काल 448 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 256 झाली आहे.

 कोरोनामुळे होणाऱया मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने ती मोठी चिंतेची बाब ठरली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने लोकांमध्ये कोरोनाबाबतची भीती वाढली आहे. कोरोनाचा फैलाव आता शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत वाढतच चालला आहे. मागील काही दिवस कोरोनामुक्त होण्याची प्रमाण चांगले असल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे.

 डिचोलीतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 109 एवढी आहे. सांखळीतील कोरोना रुग्णांची संख्या 270 एवढी आहे. पेडणेची रुग्णसंख्या 190 तर वाळपईची रुग्णसंख्या 159 एवढी आहे. म्हापसा येथील रुग्णसंख्या 202 तर पणजीची रुग्णसंख्या 217 एवढी आहे. हळदोणाची रुग्णसंख्या 118, बेतकीची  134, कांदोळीची 13, तर कासारवर्णेची रुग्णसंख्या 80 झाली आहे.

 कोलवाळची रुग्णसंख्या 135, खोर्ली 111, चिंबल 146, शिवोली 136, पर्वरी 267, तर मयेची रुग्णसंख्या 79 एवढी आहे. कुडचडेची रुग्णसंख्या 104 तर काणकोणची रुग्णसंख्या 81 एवढी आहे.

 मडगावात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

 सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह 429 रुग्ण मडगाव तर वास्कोची रुग्णसंख्या 250 एवढी आहे. बाळ्ळी 70, कासावली 99, चिंचणी 40,  कुठ्ठाळी 129, कुडतरी 61, लोटली 100, मडकई 62, केपे 81, सांगे 62, शिरोडा 90, धारबांदोडा 87, फोंडा 297 तर नावेलीची रुग्णसंख्या 81 आहे.

पाच दिवसात 44 जणांना मृत्यू

मागील पाच दिवसात कोरोनामुळे तब्बल 44 जणांता मृत्यू आला आहे. काल मंगळवारी सर्वाधिक 11 जण मृत्यूमुखी पडले. मागील शुक्रवारी 8 जणांना मृत्यू आला होता. शनिवार 9 जणांना मृत्यू तर रविवारी 7 जणांना मृत्यूने गाठले.  सोमवारी 9 जणांना कोरोनामुळे मृत्यू आला, तर मंगळवारी तब्बल 11 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यातील एकूण मृत्यूंचा आकडा आता 256 वर पोहोचला आहे.

Related Stories

प्रगती संकुल हिशोबाबाबत केंद्रीय समिती विश्वासात घेत नाही-

Patil_p

डिचोली साखळीत पावसाच्या सरी

Amit Kulkarni

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींकडून उद्या सुनावणी

Patil_p

हासरा नाचरा श्रावण आला..!

Patil_p

आरोपीला अटक, 1.30 लाखांचा गांजा जप्त

Amit Kulkarni

जमीन घोटाळा चौकशी आयुक्त गोव्यात दाखल

Amit Kulkarni