Tarun Bharat

कोरोनामुळे दुसऱयांदा मातृत्व नाकारत आहेत न्यूयॉर्कमधील माता

वॉशिंग्टन

 कोरोनाच्या महामारीने अख्ख्या जगालाच त्रस्त केलंय हे काही वेगळे सांगायला नको. सध्याला या कोरोनाने अनेकांच्या जगण्यातच बदल करून टाकला आहे. तसाच बदल न्यूयॉर्कमधील विवाहीत महिलांनी स्वीकारला आहे. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱयांदा माता बनण्याची इच्छा बाजुला ठेवली आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ग्रासमॅन स्कूल ऑफ मेडिसीन यांनी केलेल्या एका सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. त्यांनी सुमारे 1 हजार 179 महिलांना या सर्वेत सहभागी करून घेतलं होतं. जामा नेटवर्क जर्नलमध्ये यासंबंधीचा अभ्यास प्रकाशीत करण्यात आला आहे. कोरोनाचे उग्र स्वरूप पाहून दुसऱयांदा माता बनण्याची इच्छा असणाऱया विवाहीत महिलांनी आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे. यापैकी एक तृतियांश महिला दुसऱयांदा आई होण्याचा विचार करत होत्या, पण कोरोनाची वाढती महामारी पाहून त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागतो आहे. इस्पितळांमध्ये असुरक्षितता असल्याने अनेकांनी असा निर्णय घेतला आहे.

Related Stories

सर्वात उंच महिलेचा पहिला विमानप्रवास

Patil_p

फ्रान्स : स्थिती सुधारली

Patil_p

कोरोनाच्या ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरिएंटचा शोध

datta jadhav

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; पाकच्या टीव्ही चॅनेलच्या वृत्ताने खळबळ

datta jadhav

भवानी देवीची ऑलिम्पिकवारी संपुष्टात

datta jadhav

रशिया-अमेरिका संबंध संपुष्टात?

Patil_p