Tarun Bharat

कोरोनामुळे पाकमधील हॉकी मृत्यू शय्येवर : बाजवा

Advertisements

वृत्तसंस्था/ कराची

पाकिस्तानमधील हॉकी क्षेत्र आर्थिक समस्येमुळे यापूर्वी दुबळे झाले होते. पण आता कोरोना व्हायरस महामारीच्या स्थितीमुळे पाकच्या या राष्ट्रीय खेळाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून पाकमधील हॉकी मृत्यू शय्येवर असल्याचे प्रतिपादन पाक हॉकी फेडरेशनचे सरचिटणीस असिफ बाजवा यांनी केले आहे.

आशिया खंडामध्ये यापूर्वी भारताप्रमाणे पाक हॉकीने आपला दर्जा राखला होता. पाक हॉकीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पाकच्या हॉकी संघाने तीनवेळा ऑलिंपिकचे सुवर्णपदक तर चारवेळा विश्व चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे. पण अलिकडच्या काही कालावधीत पाकच्या हॉकी संघाला भक्कम पुरस्कर्त्याची उणीव  भासल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाक हॉकी संघाची कामगिरी दिवसेदिवस निकृष्ट होत गेली. आता यामध्ये कोरोना व्हायरस महामारीची भर पडली असून संपूर्ण देशाची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. कोरोना महामारीमुळे पाक शासनाला जबरदस्त आर्थिक समस्येला तेंड द्यावे लागत असल्याने पाकमधील क्रीडाक्षेत्रही दुबळे झाले आहे. पाकचे अनेक खेळाडू बेघर झाले असून त्यांची मिळकतही बंद झाली आहे. पाक हॉकी फेडरेशनची आर्थिक स्थिती संपूर्णपणे कोलमडली असल्याने पाकच्या गरजू खेळाडूंना या संस्थेकडून मदत देणे अशक्य असल्याचे बाजवा यांनी सांगितले. पाकमधील काही हॉकीपटू व्यावसायिक लीग स्पर्धा खेळण्यासाठी विदेशात गेले आहेत. त्यांची बऱयापैकी कमाई होत असताना कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावरील क्रीडा हालचाली ठप्प झाल्याने या हॉकीपटूंचे भवितव्य अधांतरी झाल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विदेशात पाकच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ हॉकी संघांना पाठविण्याकरिता पाक हॉकी फेडरेशनकडे पुरेसा पैसा नसल्याचे बाजवा यांनी शेवटी सांगितले.

Related Stories

पुरूष मुष्टीयोद्धय़ांसाठी लवकरच शिबीर

Patil_p

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, आकर्षी कश्यप उपांत्य फेरीत

Patil_p

बार्टी-अँड्रेस्क्यू यांच्यात अंतिम लढत

Patil_p

वायुदल कर्मचाऱयांकडूनश्रमदानातून पाण्याचा निचरा

Patil_p

जर्मनीच्या केर्बरची विजयी सलामी

Patil_p

एटीके बागान-बेंगळूर एफसी आज सलामीची लढत

Amit Kulkarni
error: Content is protected !!