Tarun Bharat

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

   पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जफर सरफराज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 50 वर्षांचे होते. सात एप्रिलला सरफराज यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांनंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पेशावरमधील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सरफराज मागील 3 दिवसांपासून उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

 पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाकडून सरफराज यांनी 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. वनडे सामन्यात त्यांनी 96 धावा केल्या होत्या. 1994 मध्ये सरफराज यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते पेशावरच्या सिनिअर आणि 19 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक होते. जफर सरफराज हा पाकिस्तान संघासाठी एकदिवसीय सामने खेळणारा पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू अख्तर सरफराज यांचा मोठा भाऊ होता. अख्तर सरफराज यांचेही मागील वर्षी निधन झाले.

Related Stories

‘कोव्हिशिल्ड’ डोसमधील अंतर कमी करणार

Amit Kulkarni

भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत पदार्पण

Patil_p

मोरेवाडी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप; बरखास्तीची मागणी

Archana Banage

उत्तराखंड : लष्करी वाहतुकीचा पूल गेला वाहून

datta jadhav

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, ५ कर्मचारी जखमी

Archana Banage

भारतीय तिरंदाजांना सुवर्णपदकाची पुन्हा हुलकावणी

Patil_p
error: Content is protected !!