Tarun Bharat

कोरोनामुळे बाणस्तारीचा पुरूमेंताचाही बाजार अडकला

बागायतदार व किरकोळ व्यापाऱयावर उपासमारीची वेळ लोकांनाही आवश्यक असलेले पुरुमेंत जिन्नस मिळेना

वार्ताहर / माशेल

शेकडो वर्षाची परंपरा असलेला बाणस्तारीचा पुरूमेताचा बाजार कारोनाच्या महामारीमुळे सलग दुसऱया वर्षी लांबवणीवर पडलेला आहे. सामान्य गोवेकर जून महिन्याची चाहूल लागण्यापुर्वी पावसाळय़ाच्या साठवणीसाठी पुरूमेंत करत असतो. फोंडा तालुक्यातील बाणस्तारी बाजार हा पुरूमेंताच्या बाजारासाठी प्रसिद्ध. मात्र यंदा कोरोनाच्या दुसऱया लाटेचा फैलाव रोखण्यासाठी भोम अडकोण पंचायतीने मागील दोन महिन्यापासून आठवडी बाजार बंद केलेला आहे. त्यामुळ केवळ पुरूमेंताच्या बाजावर अवलंबून असलेल्या ग्रामिण बागायतदार व किरकोळ व्यापाऱयावर कोरोनाच्या काळात दुहेरी संकट ओढवलेले आहे. 

   सरपंच सुनिल भोमकर यांनी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य कर्फ्यू जाहीर sकेला. कोरोनाकाळात खबरदारी घेणे जरूरीचे तरीही केवळ पुरूमेंताच्या बाजारावर अवलंबून असलेल्या किरकोळ व्यापाऱयावर उपासमारीची वेळ आलेली आहे.याकामी सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी व्यापाऱयांनी केली आहे. 

  बाणस्तारीच्या पुरूमेताच्या बाजाराला बेतकी खांडोळा, भोम अडकोण, पालसरे, केरी, सावईवेरे, कुकळी, म्हार्दोळ, वेलिंग, प्रि           योळ भागातील बागायतदार, शेतकरी मोठय़ा प्रमाणात आपल्या बागायतीतून उत्पन्न केलेला माल उपलब्ध करीत असे. मालाच्या विक्रीतून आलेल्या पैशातून पावसाळय़ातले तीन चार महिने सहज आपला संसार चालवित असत. पावसाळा संपता संपता चाहूल गणेश चतुर्थीच्या माटोळी बाजार यातून मिळणाऱया आर्थिक उत्पानातून घर चालवित असे.

कोरानापासून जीव वाचविण्याबरोबर संसाराचा गाढा हाकणेही कठीण

   परंतू यंदा कोरोनामुळे बागायतदाराने पेलेले उत्पन्न जशाच्यातसे पडून आहे. विशेषता कोकम, आंबा, फणस, पोळी वाळलेल्या कैरीच्या फोडी, कोकमचा रस, आगळ, तयार पेलेल्या कैऱया, तळलेल्या फणसातील गरे, वाळवून तयार केलेले गरे, असे अनेक वस्तू बागायतदार पुरूमेताच्या बाजारात विकून आपली कमाई करत होते.  परंतू यावर्षी दिवसरात्र मेहनत करून तयार केलेल्या बागायती माल जशास तसा पडून असल्याने उदारनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. नियमीत आठवडा बाजार नसल्याने घाऊक विक्रेत्यांना कमी दरात देऊन जावे लागते परिणामी त्याच्या कष्टाचा मोबदल्याइतका मोल मिळत नसल्याची खंत काही बागायतदारांनी व्यक्त केली आहे. 

शेतीमाल विकायल मिळेना, ग्राहक मिळेना, दरही मिळेना

   शेतकऱयांचीही तीच समस्या आहे. शेतकरी गेले काही महिने शेतात गावठी लाल मिरची, कांदे, कणगी, हळसांदे, चवळीचे उत्पन्न करून मे महिन्याच्या पुरूमेताच्या बाणस्तारीच्या बाजाराची आतुरतेने वाट बघत असायचे. येथे त्याच्या मालाची रास्त दर मिळत असल्याने सर्व आनंदी मुद्रेत असायचे यंदा कोरोनाचे सावटासह खाण्यापिण्याचेही वांदे झालेले आहे. या परिस्थितीत रस्त्यावर बसून माल विक्री करीत संसाराचा गाढा ओडीत आहे.

   गोव्यातील किनारपट्टीवरील सुकी मासळी विक्रेत्यांची बाणस्तारीच्या बाजारात गर्दी असायची. त्याच्याकडे सुके बांगडे, गालमो, सुकी कोळंबी व इतर सुकी मासळी लोक पावसाळय़ाच्या पुरूमेंतासाठी मोठया प्रमाणात नेत असे. यंदा मासळी विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे. त्याशिवाय सर्व प्रकारचे मसाले मोठया प्रमाणात विक्रीस येतात. पुरूमेंतासाठी खेडय़ा पाडय़ातून येणारे लोक खरेदी करतात अर्थातच मसाले विक्रेत्यांचा हा पारंपारिक व्यवसाय आहे. पण यंदा त्यानाही मोठा फटका बसणार आहे. बहुतेक ठिकाणी आठवडी बाजार बंद आहेत. राज्य कर्फ्यूमुळे सर्व ग्रामिण बागायतदारांसह इतर व्यापाऱयांचेही हाल झालेले आहे. मातीची भांडी, पारंपारिक मीठ, भाजी, कपडे व इतर छोटे मोठे व्यापारी कोरोनामुळे घरी बसावे लागलेले आहे.  बाणस्तारीचा गुरूवार व शुक्रवार असा दोन दिवस भरणाऱय़ा आठवडी बाजारांवर शेकडो व्यापारी आपले पोट भरत असे. गेल्या दोन महिन्यापासून व्यापार बंद झाल्याने ते कार्जबाजारी झाल्याची कैफियतही काही व्यापाऱयांनी मांडली. कोरोनातून सावरून कधी एकदाची परिस्थिती पुर्वपदावर येणार याची आस धरून व्यवसायिक बसले आहेत.

Related Stories

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरच

Amit Kulkarni

वाहनचालकांनी दंडाची रक्कम कोणत्या दराने भरायची?

Amit Kulkarni

अकरा आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची

Amit Kulkarni

वाहतूक संचालकाची हाकलपट्टी करा

Amit Kulkarni

राज्यभरात पूरसदृश स्थितीने दाणादाण

Omkar B

मोरजी ग्रामसभेतही विधवा महिलांना सन्मान मिळण्यासंबंधीचा ठरावमंजूर

Amit Kulkarni