Tarun Bharat

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राला कर्जाचे वंगण

केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरातमधून कर्नाटकात आलेल्या अनेक प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संकटामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठी कर्जे उचलण्याची तयारी कर्नाटकाने केली आहे.

कर्नाटकात जवळजवळ लॉकडाऊन शिथिल झाले आहे. बससेवाही सुरू झाली आहे. त्यामुळे गावगाडा पुन्हा पूर्वपदावर येऊ लागला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर कोरोना रुग्णात मोठी वाढ दिसून येत आहे. मात्र, ही वाढ परराज्यातून येणाऱया रुग्णांच्या बाबतीतील आहे. खास करून महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांमुळे कर्नाटकातील रुग्णसंख्येत भर पडते आहे. मंडय़ा जिल्हय़ात एका दिवसात मुंबईहून आलेल्या 71 जणांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार कर्नाटकात गेल्या 12 तासात 116 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर रुग्णसंख्या 1,578 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 41 जण दगावले आहेत. बरे होणाऱया रुग्णांची संख्या 570 वर पोहोचली आहे.

बससेवेनंतर कर्नाटकात आता रेल्वेसेवाही सुरू होणार आहे. शिक्षण खात्याने दहावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीचा शिल्लक असलेला इंग्रजी विषयाच्या एकाच पेपरसाठी तारीख ठरविण्यात आली आहे. 25 जून ते 4 जुलैपर्यंत दहावीचे वेळापत्रक ठरले आहे. त्यामुळे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होण्याची शक्मयता आहे. एकंदर हळूहळू सर्व काही सुरळीत होत असतानाच लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे रुग्णसंख्येत चिंतनीय वाढ होत आहे. अद्याप हॉटेल्स, सिनेमागृहे, मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हॉटेलमध्ये सध्या पार्सलला परवानगी आहे. बेळगावसह कर्नाटकातील बाजारपेठा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. बसमध्ये केवळ 30 प्रवाशांना मुभा दिली जात आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. केशकर्तनालयेही सुरू झाली आहेत. उद्योगधंदे सुरू झाले असले तरी त्यांना कच्च्या मालाची कमतरता भासते आहे. परराज्यातून कर्नाटकात येणाऱया व कर्नाटकातून आपापल्या गावी जाणाऱया कामगारांचे लोंढे सुरूच आहेत. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरातमधून कर्नाटकात आलेल्या अनेक प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना संकटामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठी कर्जे उचलण्याची तयारी कर्नाटकाने केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 52,918 कोटी कर्ज उचलण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अतिरिक्त 15 हजार कोटी उचलण्याची तयारी सुरू आहे. 68 हजार कोटींचे कर्ज घेऊन विकासाला गती देण्याचे सरकारने ठरविले आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 50 दिवसांचा लॉकडाऊन होता. याकाळात आर्थिक स्रोतच बंद झाले आहेत. त्यामुळेच कर्ज उचलण्याची तयारी सुरू आहे. याबरोबरच राज्यातील ग्रा.पं.ची मुदत संपली आहे. ग्रा.पं. साठी निवडणुका घ्यायला हव्या होत्या. कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रा.पं.वर समिती नेमण्याचा सरकारचा विचार आहे. याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. ज्या ज्यांची मुदत संपली आहे, त्या ग्रा.पं.वर प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यासंबंधी सरकारने सर्व जिल्हाधिकाऱयांना पत्रे पाठविली आहेत.

आता याच मुद्दय़ावर काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ग्रा.पं.च्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरची लढाई लढण्याचे काँग्रेसने घोषित केले आहे. काँग्रेसच्या राजवटीतही असे निर्णय घेण्यात आले होते. मुदत संपलेल्या ग्रा.पं. वर भाजप कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव खपवून घेतला जाणार नाही, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री येडियुराप्पा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही निवडक चेहरे वगळता या काळात त्यांच्यासोबत अन्य कोणी दिसले नाहीत. पुढच्या एक-दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची भीती आहे. कारण अन्य राज्यातून कर्नाटकात येणाऱयांमुळे बाधितांची संख्या वाढती आहे. चालू महिन्याअखेरपर्यंत ही संख्या 3 हजारवर पोहोचेल तर जून अखेरपर्यंत 10 ते 12 हजार जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्मयता आरोग्य खात्यानेच वर्तविली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारीही केली आहे.

राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. सरकारच्या धोरणाविरुद्ध विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी धरणे धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज हा आणखी एक जुमला आहे. सरकारने जाहीर केलेले विशेष आर्थिक पॅकेज खऱया अर्थाने संकटात असलेल्या लाभार्थींपर्यंत पोहोचणे अशक्मय आहे. सरकारने वेळीच दक्षता घेतली असती तर इतक्मया मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला नसता, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. खरेतर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. भविष्यात थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाच अधिक आहे. कामगारांचे लोंढे थांबवता येत नाहीत. किमान त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले आणि व्यवस्थितपणे तपासणी केली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.

सध्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. रात्रीच्या 7 नंतर जमावबंदीचा आदेश लागू आहे. संपूर्ण जगाला सतावणाऱया कोरोनापासून सध्यातरी आपली सुटका होईल, असे वाटत नाही. कारण त्याच्यासोबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याची सवय नागरिकांना होताना दिसते आहे. वेगवेगळय़ा माध्यमातून सरकारने जनजागृती केली आहेच, आता स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. दहावी-बारावी परीक्षेत किती गुण मिळतात, यावर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य ठरत असते. दिवसरात्र मेहनत करून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या आशाआकांक्षावर कोरोनामुळे मळभ दाटले आहे. या सर्व संकटांवर मात करून विद्यार्थी परीक्षेत आपला ठसा उमटविणार, यात शंका नाही.

Related Stories

चीनची लबाडी

Patil_p

पर्यावरणाचे ‘पंचामृत’

Patil_p

स्टार्टअपचा बोलबाला!

Patil_p

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व्यवस्थापन

Amit Kulkarni

पालिका बजेटमधून आरोग्यम् धनसंपदाचा जप

Patil_p

द्वादशी व्रताची सांगता

Patil_p