Tarun Bharat

कोरोनामुळे यंदा IITs, IIITs कडून फी वाढ नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


कोरोना आपत्तीमुळे शिक्षा वर्ष 2020-21 मध्ये इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या केंद्रीय शिक्षा संस्थांकडून कोणत्याही अभ्यासक्रमासाठी ट्युशन फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. 

ते म्हणाले, पीपीपी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या IIITs संस्थांनीही शैक्षणिक संस्थांनीही शैक्षणिक  शुल्कात वाढ करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला IIT सह  देशातील तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी. टेकच्या अभ्यासक्रमासाठी साधारण वर्षाला दोन लाखांचे शुल्क आकारण्यात येते.  

तर IIITs संदर्भात सांगताना ते म्हणले, ज्या केंद्रीय अनुदानित संस्था आहेत आणि ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी नेहमी दहा टक्के शुल्कवाढ केली जाते ती यंदा केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच इतर कोर्ससाठी देखील त्यांनी फी वाढ करू नये अशी विनंती त्यांना केली आहे. 

दरम्यान, यंदा कोरोनामुळे अनेक शैक्षणिक संस्थाच्या परीक्षा रखडल्या आहेत. महाराष्ट्र शिक्षा मंडळाने तर दहावीचा भूगोल विषयाचा पेपर तर कोरोनामुळे रद्द केला आहे. त्याच बरोबर पहिली ते आठवी आणि अकरावी इयत्ता मधील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Related Stories

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage

जीएसटी परिषदेच्या सूचना केंद्र-राज्यांवर बंधनकारक नाहीत

Amit Kulkarni

काश्मीर मुद्दा उपस्थित करणे पाकच्या अंगलट

Patil_p

पंजाब निवडणुकीवर काळापैसा-ड्रग्सचे सावट

Patil_p

राज ठाकरेंकडून सर्व कार्यकर्त्यांना सूचना

prashant_c

महाराष्ट्रात आज दिवसभरात 11,111 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav