Tarun Bharat

कोरोनामुळे सरकारी शिमगोत्सव रद्द

Advertisements

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती

प्रतिनिधी / पणजी

कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे सरकारी पातळीवरील मडगाव, फोंडा  व पणजीत होणारा शिमगोत्सव रद्द केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी विधानसभेत शून्य तासाला दिली.

सुदिन ढवळीकर यांनी शिमगोत्सवाचा प्रश्न उपस्थित केला होता. सरकारी शिमगोत्सव साजरा केला तर 9 तालुक्यात करावा. तीन ठिकाणी करून इतरांवर अन्याय केला जाऊ नये, असे त्यांनी सूचविले. ज्यांनी चित्ररथ आणि रोमटामेळाची तयारी केली आहे, त्यांना सरकारने योग्य ती मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारी पातळीवरील शिमगोत्सवात नेहमी पथके सामील होतात. त्यांना गेल्यावर्षी सरकारने ज्या पद्धतीने मदत केली, त्याच पद्धतीने मदत केली जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

सर्व मंदिरांमधील धार्मिक शिमगोत्सव सुरू राहणार

गोव्यात प्रत्येक मंदिरात धार्मिक पद्धतीने जो शिमगोत्सव चालू असतो तो संक्षिप्त प्रमाणात चालू राहणार आहे. त्यासाठी वेगळी मान्यता घेण्याची गरज नाही. आचारसंहिता पाळून, मास्क लावून, सुरक्षित अंतर ठेवून हा सण साजरा केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकारी पातळीवरील शिमगोत्सव रद्द झाल्याची घोषणा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना करायची होती. तुम्हाला शिमगोत्सव हवा की नको, असे विचारून शिमगोत्सव का महत्त्वाचा, यावर लांबलचक व्याख्यान देत होते. त्यावेळी मुख्यमंत्री मध्येच उभे राहिले व यंदाचा सरकारी शिमगोत्सव रद्द झाल्याचे सांगितले. त्यानंतर पर्यटनमंत्र्यांनी आपली वेगळी घोषणा करताना शिमगोत्सव रद्द झाल्याचे कळविले. तुम्ही म्हणाल, बाबूंना टक्केवारी हवी म्हणून शिमगोत्सव हवा आहे. पण लोकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने शिमगोत्सव रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी पातळीवर घेतली जाणारी चित्ररथ आणि रोमटामेळाची स्पर्धा फक्त मडगाव आणि फोंडा येथेच भरवली जाणार होती. पर्यटकांना आकर्षण म्हणून सरकारी पातळीवर कार्निव्हल आणि शिमगोत्सव केला जातो. त्यामुळे पणजीलाही संधी देण्यात आली. पण आता शिमगोत्सवच रद्द झाल्याने विनाकारण आरोप करण्याचे विरोधकांनी सोडावे आणि आपल्या मतदारसंघातही शिमगोत्सव व्हावा म्हणून मागणी सोडावी, असे आजगावकर म्हणाले

Related Stories

मोपावर गोमंतकीय कर्मचारी दिसावेत ः सरदेसाई

Patil_p

कर्नाटकात जाण्यासाठी केरी तपासणी नाक्यावर गर्दी

Omkar B

आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डात सुरू केले ‘ई-कार्ट’

Amit Kulkarni

इफ्फीमध्ये वाजणार मराठी चित्रपटांचा डंका

Omkar B

एसीजीएल कामगार पगारवाढ करारांवर 8 रोजी होणार सहय़ा

Amit Kulkarni

गोल्डन बूटधारक इगोर अँग्युलो देणार ओडिशासाठी एफसी गोवाला सोडचिठ्ठी

Amit Kulkarni
error: Content is protected !!