Tarun Bharat

कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे सव्वा चार कोटी खर्च

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाला रोखण्यासाठी सातारा जिह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य विभागाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. त्याकरता जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासाठी 5 कोटी 79 लाख 58 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी 4 कोटी 30 लाख 15 हजार 603 रुपये इतका खर्च झाला असून 1 कोटी 49 लाख 42 हजार 397 रुपये शिल्लक आहेत. कोरोनाच्या लढाईत 97 लाख रुपये ही पीपीई किटसाठी खर्च झाले आहेत.

 कोरोना जिह्यात आल्यापासून त्या विरोधात लढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरता जिह्यातील 27 कोरोना केअर सेंटरवर सव्वा चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 11 हजार 340 जणांचे स्वॉब तपासणीसाठी घेण्यात आले. पूर्वी कोरोना टेस्टसाठी 4 हजार 500 रुपये खर्च येत होता. आता 2 हजार 200 रुपये येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना केअर सेंटरची देखरेख केली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासाठी 5 कोटी 79 लाख 58 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी 4 कोटी 30 लाख 15 हजार603 रुपये इतका खर्च झाला असून 1 कोटी 49 लाख 42 हजार 397 रुपये शिल्लक आहेत. पीपीई कीटसाठी 97 लाख 41 हजार, व्हीटीएस कीटसाटी 82 लाख 45 हजार, सॅनिटायझरसाठी 8 लाख 85 हजार, बॉडी बॅगसाठी 3 लाख 12 हजार, फेसशिल्डसाठी 2 लाख 56 हजार, थर्मा मीटरसाठी 34 लाख 26 हजार, डिजीटल पल्स ऑक्सीमीटरसाठी 6 लाख 68 हजार, एन  95 सह अन्य मास्कसाठी 6 लाख 68 हजार, एसटी भाडे 5 लाख 31 हजार, एसएमएस पॅकेज 8 लाख, महिला बचतगट 5 लाख 84 हजार, जिल्हा परिषद कॅन्टीनसाठी 3 लाख 97 हजार, झेडपी मुद्राणालयसाठी 9 लाख 71 हजार, सॉफ्टवेअर सिस्टिमसाठी 5 लाख, पोलिसांच्या शिटय़ा आणि ओळखपत्रासाठी 2 लाख 41 हजार, अधिकाऱयांचे इंधन 30 लाख, औषध व साहित्य खरेदीसाठी 23 लाख 62 हजार रुपये खर्च झाले आहेत.

Related Stories

INS विक्रांत निधी प्रकरणी सोमय्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

Archana Banage

शिरंबे येथे वीज पडून ऊस जळाल्याने मोठे नुकसान

Archana Banage

शिवसेनेचे ‘हिंदुत्व’ वंचितला मान्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीसाठी साद

datta jadhav

राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

Archana Banage

राष्ट्रवादी ओबीसी सेल आक्रमक

datta jadhav

कैलास स्मशानभूमीत 2 वर्षात कोविडच्या 2201 जणांवर अंत्यसंस्कार

datta jadhav