Tarun Bharat

कोरोनावरील लसीची रंगीत तालीम

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनावरील लसीची ‘ड्राय रन’ म्हणजेच रंगीत तालीम शनिवारी बेळगावमध्ये करण्यात आली. वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या तालमीवेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे उत्तर कर्नाटकाचे साहाय्यक संचालक डॉ. आप्पासाहेब नरट्टी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, जागतिक आरोग्य संघटनेचे बेळगाव जिल्हय़ाचे पदाधिकारी डॉ. सिद्धलिंगय्या, आरोग्याधिकारी डॉ. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ आदी उपस्थित होते.

या तालमीसाठी 25 जणांची निवड करण्यात आली असून प्रामुख्याने पहिल्या तालमीवेळी आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यांची निवड करण्यात आली. बेळगावबरोबरच कित्तूर आणि हुक्केरी येथील आरोग्य केंद्रांमध्ये ही तालीम पार पडली.

कोरोना प्रतिबंधक लस देताना एक ठरावीक साखळी अंमलात आणावी लागते. लस बाजारपेठेत आल्यापासून ती रुग्णाला देईपर्यंत काही विशिष्ट नियमावलींचे पालन आवश्यक आहे. लस ठेवण्यासाठी शीतपेटी आवश्यक असून या साखळीतील एकही दुवा कच्चा निघाला तर लस निकामी ठरते. लस प्रक्रियेमध्ये सर्व डाटा संकलनसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

याच पार्श्वभूमीवर शनिवारी ही रंगीत तालीम करण्यात आली. लस प्रत्यक्षात दिली गेली नसली तरी त्याचे प्रात्यक्षिक शनिवारी करण्यात आले. वंटमुरी येथील आरोग्य केंद्रात सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत ही तालीम पार पडली. कोरोना अद्याप गेला नसल्याने कोविड-19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन यावेळी करण्यात आले. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या यांना लस प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्याचा सर्व तपशील संकलीत करण्यात आला. जिल्हाधिकाऱयांनी तपशील तसेच लस देण्याची प्रक्रिया या संदर्भात सर्व माहिती घेऊन पाहणी केली.    

Related Stories

अंगणवाडी सेविकांचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Patil_p

क्षुल्लक कारणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

31 डिसेंबरला होणारे गैरप्रकार रोखा!

Amit Kulkarni

गो-शाळेमुळे भाकड गायींचा प्रश्न मार्गी

Amit Kulkarni

दीड दिवसाच्या श्री विसर्जनासाठी फिरत्या वाहनांची सोय

Amit Kulkarni

बेळगावात ‘डायल 112’ सेवेचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!