Tarun Bharat

कोरोनावरील लस आज बेळगावला येणार

विशेष विमानाने बेळगाव-बेंगळूरला पोहोचविणार लस

प्रतिनिधी/ बेळगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या चर्चेनंतर कोरोनावरील लस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत विशेष विमानाने लस बेळगावला येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली.

बेळगाव विभागासाठी चार लाख डोस पाठविण्यात येणार आहेत. खरे तर सोमवारी रात्रीपर्यंत बेळगाव आणि बेंगळूरला लस दाखल व्हायला हवी होती. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत विशेष विमानाने बेळगाव आणि बेंगळूरला ही लस पोहोचविण्यात येणार आहे.

सोमवारी 3 पॉझिटिव्ह रुग्ण

दरम्यान सोमवारी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोनवाळ गल्ली, टिळकवाडी व कोगनोळी येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26,420 इतकी झाली आहे. आतापर्यंत 25 हजार 920 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 158 सक्रिय रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 4 लाख 22 हजार 730 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 3 लाख 88 हजार 494 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 59 हजार 450 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये असून 5 हजार 424 जणांचे अहवाल यायचे आहेत.

बेळगाव येथून सात जिल्हय़ांना पुरवठा

पुण्याहून विशेष विमानाने लस आल्यानंतर बेळगाव येथून सात जिह्यांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाटी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती वरि÷ अधिकाऱयांनी दिली. 4 लाख डोस बेळगावसाठी पाठविण्यात येणार आहेत.

Related Stories

पोतदार के.आर शेट्टी किंग्ज, झेवर गॅलरी डायमंड्स संघ विजयी

Amit Kulkarni

मंत्री उमेश कत्ती यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

लोकमान्य ग्रंथालयात अब्दुल कलाम जयंती साजरी

Patil_p

निलजी येथून दिंडी पंढरपूरकडे रवाना

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात वाळूतस्करी करणाऱयांवर कारवाई करा

Patil_p

होनग्याजवळ कारला अपघात

Patil_p
error: Content is protected !!