Tarun Bharat

कोरोनावरील TOCIRA औषधाला मंजुरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना उपचारात प्रभावी ठरलेल्या टोसिजिजुमॅब म्हणजे TOCIRA या कोरोनावरील जेनेरिक औषधाच्या आपात्कालीन वापराला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. हेटेरो कंपनीच्या हैदराबादमधील हेटेरो बायोफार्मा युनिटमध्ये या औषधाची निर्मिती केली जाणार असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात हे औषध उपलब्ध होईल, असे हेटेरो कंपनीकडून सांगण्यात आले.

हेटेरो कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाबाधित व्यक्ती ऑक्सजिन, व्हेंटिलेटर आणि एक्स्ट्राकॉर्पोरेल ऑक्सीजनसेशनवर असेल तर त्याला हे औषध दिले जाणार आहे. कंपनीच्या मजबूत नेटवर्कमुळे संपूर्ण देशभरात सहजरित्या औषध उपलब्ध करुन दिलं जाईल. औषधाच्या समान वितरण पद्धत सुनिश्चित करण्यासाठी सरकारसोबत काम करू, असेही कंपनीने या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

लसीकरणात भारत तिसऱया क्रमांकावर

Patil_p

‘प्रश्नोत्तरा’वरून गोंधळाचा श्रीगणेशा

Patil_p

‘वेला’ स्कॉर्पियन पाणबुडी नौदलात सामील

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही जमीन खरेदी करता येणार

Patil_p

चिंताजनक : उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 41 हजाराच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

आघाडीचा चौथा उमेदवार विजयी होणार; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage