Tarun Bharat

कोरोनावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांचे हित जपणे हे माझे एकमेव लक्ष: मुख्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी मुख्यमंत्री येडियुराप्पांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी राज्यात कोविड -१९ वर नियंत्रण ठेवणे आणि लोकांचे हित जपणे हे माझे एकमेव लक्ष आहे, असे सांगितले. दरम्यान, राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.

“मुख्यमंत्र्यांनी कोविड, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि लोकांचे हित जपणे ही माझी प्राथमिकता आहे. जर कोणी नेतृत्व बदलाविषयी कुठेतरी गेले असतील (दिल्लीतील काही आमदार हायकमांडला भेटायला गेले असतील) तर त्यांना योग्य उत्तरे दिली गेली आहेत आणि हाय कमांड द्वारा परत पाठवले आहे, ” असे येडियुरप्पा म्हणाले.

बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कोरोनामुळे लोक संकटात सापडले आहेत आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा त्यावर एकत्रितपणे नियंत्रण ठेवणे हे आमदार, मंत्री आणि सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे. कोरोना नियंत्रित ठेवण्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, माझ्यासमोर इतर काही बाब नाही, कोविडला तोंड देणे ही माझे प्रथम प्राधान्य आहे,” असे ते पुढे म्हणाले.

Related Stories

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना

Omkar B

राज्य मंत्रिमंडळ विस्तार ग्रा. पं. निवडणुकीपूर्वी?

Patil_p

कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील नेते पोलीसांच्या ताब्यात

Archana Banage

कॉंग्रेस नेते प्रियांक खरगे यांची केंद्र सरकारवर टीका

Archana Banage

कर्नाटकात मंगळवारी २ हजाराहून अधिक रुग्णांची भर

Archana Banage

परिवहन संपासंबंधी संभ्रमाची स्थिती

Patil_p