Tarun Bharat

कोरोनाविरूध्दच्या जागृतीसाठी गीतांनंतर आता मिमिक्रीचा आधार

Advertisements

प्रतिनिधी / वास्को

वास्को पोलिसांनी कोरोना संसर्गाविरूध्द वाडय़ावाडय़ावर जनजागृती करणे सुरूच ठेवले आहे. हिंदी सिने गीतांच्या चालींवर आधारीत कोंकणी गीते गात कोरोनाविरूध्द जागृती करीत आता या जागृतीसाठी मामिक्रीचीही मदत घेण्यात येत आहे. यात होमगार्ड आणि ऑकेस्ट्रा कलाकार रफिक बागवाले महत्वाची भुमीका बजावत आहेत.

मागच्या आठ दिवसांपासून वास्को, मुरगाव, दाबोळी इत्यादी भागात वास्को, मुरगाव व वेर्णा पोलीस व रेल्वे पोलीसही कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने लढा  द्यावा असे गीतांमधून लोकांना संदेश देताना सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबतही पोलीस मार्गदर्शन करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्रासिएस यांनी प्रथम गीतांमधून जागृती करण्यास सुरवात केली. पोलीस शिपाई व गायक कलाकार दयानंद केरकर यांनीही गीत गायनातून जागृती केली. इतर पोलिसांनीही जागृतीसाठी गीतांचा आधार घेतला आहे. आजही अनेक ठिकाणी पोलीस पथक गीत गात कोरोनाविरूध्द जागृती करीत आहेत.

हल्लीच या उपक्रमात मिमिक्रीचीही भर पडली आहे. गोवा पोलिसांतील होमगार्ड तसेच ऑकेस्ट्रा कलाकार रफिक बागवाले यात महत्वाची भुमिका बजावत आहेत. रफिक इतर पोलीस अधिकाऱयांसमवेत ठिकठिकाणी गीत गाण्यांबरोबरच कोरोनाविरूध्दच्या जागृतीवर आधारीत अनेक हिंदी सिने अभिनेत्यांच्या नकला करीत आहेत. अनेक प्रसिध्द अभिनेत्यांच्या आवाजातून कोरोना जागृती या जागृती मोहिमेतील अनोखे आकर्षण ठरत आहेत.  पोलिसांच्या या जागृतीला नागरिकांचा प्रतिसादही लाभत आहे.

Related Stories

आसगावचे माजी सरपंच व्हिक्टर डिसोझा यांचे निधन

Amit Kulkarni

पिसुर्लेतील शेतकऱयांची 10 रोजी महत्त्वाची बैठक

Amit Kulkarni

आमदार अपात्रता प्रकरणी खास खंडपीठाची नियुक्ती करा

Patil_p

ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे शोभा काणकोणकर यांचा सत्कार

Amit Kulkarni

भंडारी समाजातील उमेदवारांना संधी देणाऱया पक्षांना पाठिंबा

Amit Kulkarni

गोव्यात शिवसेना राजकीय क्रांती करणार : जितेश कामत

Amit Kulkarni
error: Content is protected !!