Tarun Bharat

कोरोनाविरोधी युद्धात सैन्य ठरले उदाहरण

Advertisements

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सैन्यात संक्रमणाचा दर जवळपास शून्य ः 99 टक्के सैनिकांचे लसीकरण 

भारतीय सैन्याने पुन्हा एकदा देशासमोर उदाहरण प्रस्थापित केले आहे. पूर्ण देश कोरोनाच्या दुसऱया त्सुनामीला तोंड देत असताना लसीकरण कार्यक्रम आणि कोविड प्रोटोकॉलच्या पालनात झिरो टॉलरन्सच्या दुहेरी प्रयोगाद्वारे सैन्याने संक्रमणाचा दर जवळपास शून्यावर आणला आहे. विशेष बाब म्हणजे सैन्याने ही कमाल मागील दोन महिन्यांपेक्षाही कमी काळात करून दाखविली आहे.

देशात प्रतिदिन कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सैन्यात संक्रमणाचा दर शून्यच आहे. देशभरात कोरोनाचे प्रतिदिन 3-3.25 लाख नव्या रुग्णांच्या तुलनेत सैन्यात ही संख्या 50-60 दरम्यान देखील नाही. सापडत असलेले नवे रुग्ण देखील स्वतःच्या कुटुंबासोबत बाहेर राहिल्याने संक्रमित होत आहेत.

11.5 लाख जणांना दुसरा डोस

एकूण 400 सैन्य कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. सैन्याने देशभरातील सैन्य युनिटांमध्ये मार्चपासूनच कोविडसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली होती आणि 20 एप्रिलपर्यंत सुमारे 14 लाख सैनिकांपैकी 99 टक्के जणांना लस देण्यात आली आहे. यातील 82 टक्के म्हणजेच 11.5 लाख सैन्य कर्मचाऱयांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.

कोविड सुविधा पुरविली

सैन्याला लसीचे कवच पुरविण्यात आल्यावर 22 एप्रिलपासून दिल्लीतील बेस हॉस्पिटलला कोविड उपचार सुविधेत बदलण्यात आले आहे. येथे ऑक्सिजनची gविधा असलेल्या सर्व 258 बेड्सवर रुग्णही दाखल करण्यात आले आहेत. सैन्याने दिल्लीत एक हजार बेड्सचे स्वतःचे रुग्णालय देखील जनतेसाठी खुले केले आहे.

अन्य शहरांमध्येही थेट मदत

भारतीय सैन्याने देशाची सेवा करणाऱया माजी सैनिकांसाठीही स्वतःच्या रुग्णालयांचे दरवाजे खुले केले आहेत. यांतर्गत सैन्याने पाटण्यात स्वतःचे 500 बेड्सचे रुग्णालय खुले केले आहे. याचबरोबर सुमारे 450 बेड्सचे रुग्णालय लखनौमध्ये, 750 बेड्सचे रुग्णालय वाराणसीत आणि 900 बेड्सचे रुग्णालय अहमदाबादमध्ये जनतेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तर रुग्णांची गरज पाहता या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून पुढील 7 दिवसांमध्ये दुप्पट करण्यात येत आहे.

Related Stories

सद्यःस्थितीचे कारण दाखवून आरोग्य विम्याचा लाभ नाकारता येणार नाही !

Patil_p

5 हजारांची तारणहार कमल कुंभार

Patil_p

‘या’ राज्यांमध्ये जानेवारीपासून सुरू होणार शाळा

Rohan_P

तरूण भारत आजरा कार्यालय वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा

Sumit Tambekar

सर्वोच्च न्यायालय थेट प्रक्षेपणासाठी स्वतःची यंत्रणा उभारणार

Patil_p

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये; पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!