Tarun Bharat

कोरोना आयसोलेशन केंद्राची उभारणी करा

Advertisements

भाजपचे किरण जाधव यांनी दिले निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

रुग्णांना शुद्ध ऑक्सिजन मिळणे तातडीची गरज आहे. त्यासाठी कर्नाटक स्टेट टेक्स्टाईल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑटोनगर येथील प्रशस्त जागेमध्ये आयसोलेशन म्हणजेच विलगीकरण केंद्र सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी कर्नाटकचे अवजड व लघुउद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांना दिले.

सध्या बेळगावमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्सची स्थिती बिकट झाली आहे. ज्या स्वयंसेवी संस्था ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करत होत्या, त्यांच्यावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असून त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी हॉस्पिटलमध्येही ताण वाढला आहे. यावर उपाय म्हणून ऑटोनगर येथील टेक्स्टाईल इन्फ्रास्ट्रक्चरच्या 35 ते 40 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आयसोलेशन कोविड केंद्र सुरू केले तर रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. मुख्य म्हणजे या प्रशस्त आणि मोकळय़ा जागेमध्ये रुग्णांना पुरेसा प्राणवायू मिळणे शक्य होणार आहे. तेव्हा सरकारने याचा विचार करावा, असेही किरण जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. जगदीश शेट्टर यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्यादृष्टीने लवकरच आपण कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.

Related Stories

कृषी उत्पादित मालावर निर्बंध नाहीत

Patil_p

मोफत दूध घेण्यासाठी धावपळ-गोंधळ

Patil_p

मनपाकडून शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची गणती सुरू

Patil_p

पुष्प नक्षत्रात गडगडाटासह पावसाची हजेरी

Patil_p

हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करणाऱयांना नोटिसा

Patil_p
error: Content is protected !!