Tarun Bharat

कोरोना काळातही बेळगावसाठी अट्टापीट्टा सुरूच

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्योत्सव दिनानिमित्त दरवषी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कमानीची उभारणी करण्यात येते. यावषीही ही कमान उभी करण्यात येत आहे. मात्र सध्या कोरोनामुळे जनता अडचणीत असताना देखील ही कमान उभे करण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून विविध कार्यक्रमांवर बंदी घालणारे जिल्हा प्रशासन स्वतःच कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दाखवून देत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यावषी कोरोनामुळे सर्वच मिरवणुकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 1 नोव्हेंबर राज्योत्सव दिनाच्या मिरवणुकीवरही बंदी आहे. असे असताना कमान कशासाठी उभे करण्यात येत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. सरकारकडे आर्थिक चणचणही निर्माण झाली आहे. असे असताना कमान उभे करून खर्च वाया घालण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

बेळगाव आपले आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न दरवषीच सुरू असतो. किमान कोरोना काळात तरी याचे भान हवे होते. मराठी भाषिकांच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालणे आणि आपण मात्र ते निर्बंध तोडणे असा प्रकार सुरू असल्याचे पहयला मिळत आहे. या कमानीमुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. एक तर कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच ही कमान उभी केल्यामुळे आणखीनच अडचण होत आहे. कमान उभे करण्याचे काम करत असलेले कामगार देखील तोंडाला मास्क नसतानाच काम करत आहेत. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

सर्वांना समान नियम लागू करणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासनच प्रत्येक ठिकाणी दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक कमान उभे करण्यासाठी तसेच इतर काही ठिकाणी उभे करण्यात येणारे फलक यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा चुराडा होत आहे. तो थांबणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. किमान कोरोना काळात तरी भान बाळगावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत..

Related Stories

मांगल्याचे सीमोल्लंघन आज

Patil_p

सांगा आता आम्ही कसे जगू?

Amit Kulkarni

डिझेल टँकरमधून बेकायदा दारू वाहतूक

Amit Kulkarni

काहेर विद्यापीठाच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता

Amit Kulkarni

संगीत कलाकार संघाची उद्या बैठक

Amit Kulkarni

बेळगावच्या सुजय सातेरीचे मोसमातील तिसरे शतक

Amit Kulkarni