Tarun Bharat

कोरोना काळातील आशा कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद

Advertisements

केएमफचे संचालक आप्पासाहेब अवताडे : ऐनापूर येथे धनादेश वितरण

प्रतिनिधी/ कागवाड

कोरोना महामारी संपूर्ण देश नव्हे तर जगाला संकटात टाकले आहे. अशा गंभीर परिस्थितीत आशा कार्यकर्त्यांनी आपले जीव धोक्मयात घालून केलेली जनतेची सेवा फार मोठी आहे. तसेच त्यांनी मागणी केलेले प्रति महिना 12 हजार रुपये त्यांच्या श्रमाप्रमाणे फारच कमी आहे. ती रक्कम सरकारने त्यांना तातडीने द्यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्ते तथा केएमफचे संचालक आप्पासाहेब अवताडे यांनी केली. सोमवारी ऐनापूर येथील केआरईएस शिक्षण संस्थेच्या प्रांगणात  कागवाड तालुक्मयातील आशा कार्यकर्त्यांचा सत्कार तसेच कोरोना काळात केलेली विशेष सेवा “कोरोना वारियर्स’’ म्हणून प्रत्येकी 3 हजार रुपयाचा धनादेश 65 कार्यकर्त्यांना देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, अथणी साखर कारखान्याचे एमडी श्रीनिवास पाटील उपस्थित होते. त्यांचा हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.

  यावेळी बोलताना केएमएफ बेळगाव जिल्हय़ाचे सह व्यवस्थापक व्यंकटेश जोशी यांनी, कोरोना काळात आशा कार्यकर्त्यांची सेवा स्वतःचा जीव धोक्मयात घालून दुसऱयांचे जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. या कार्यकर्त्यांना शासनाकडून 6 हजार रुपये मानधन मिळते. ते फारच कमी आहे. त्यांना केएमएफ संस्थेच्या विविध उत्पन्नातील पदार्थ विकण्यासाठी विशेष कमिशन देण्यात येत आहे. त्यांची विक्री करून लाभ मिळवून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. 10 तालुक्मयातील आशा कार्यकर्त्यांना 25 लाख रुपये सहाय्यधन दिले आहे. दिला आहे. कागवाड तालुक्मयासाठी 65 कार्यकर्त्यांना प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 समारंभाच्या अध्यक्षस्थानी कागवाड भागातील केएमएफचे संचालक बाबू वाघमोडे होते. ऐनापूर केआरइएस शिक्षण संस्था संचालक दादा पाटील, वसंत खोत, अधिकारी बी. के. जाधव, संतोष गावडे उपस्थित होते.

Related Stories

सीमालढय़ावरील पुस्तकाचे 27 रोजी मुंबईत प्रकाशन

Patil_p

शहरातील निम्मे पथदीप-हायमास्ट बंदच

Amit Kulkarni

काटामारी थांबवण्यासाठी भात केंद्र सुरू करण्याची गरज

Patil_p

बॅ.नाथ पै चौकात गटारीचे काम सुरू

Patil_p

मनपा व्यापारी संकुलांची आयुक्तांकडून पाहणी

Amit Kulkarni

बाळेकुंद्री लक्ष्मी देवीची ओटी भरणे कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!