Tarun Bharat

कोरोना काळात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम प्रशंसनीय – पालकमंत्री

प्रतिनिधी / सातारा

कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार वितरण सोहळा श्री. पाटील यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. सोनाली पोळ, अर्थ शिक्षण व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविकांना गावातील प्रत्येक कुटुंबाची इत्यंभूत माहिती असते गावातील बाळांना व गरोदर मातांना स्वच्छतेबाबत, बालकांच्या पोषण व आरोग्याविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत करीत असतात. बालकांच्या योग्य शारिरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालण्याचे काम या सेविका करीत असतात. कोरोना काळात व इतर काळातही सेविकांचे काम चांगले होते. म्हणून आज आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्यांचे अभिनंदन व ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत त्यांनी या सेविकांचे आदर्श घेऊन चांगले काम करावे. सातारा जिल्हा परिषद नेहमीच विविध अभियानात चांगले काम करीत असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकूण 108 आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वारसांना विमा कवच सानुग्रह सहायय अनुदान रक्क्म रुपये 50 लक्ष धनादेशाचे वितरण करण्यात आले.

Related Stories

पिंपरी चिंचवडची चिंता वाढली; एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह

prashant_c

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आमचा विरोध नाही- प्रकाश आंबेडकर

Abhijeet Khandekar

‘सुपारी’ घेणाऱ्यांची झाली गोची

datta jadhav

कोडोलीचे रेव्हरंड सुमित्र विभूते यांचे निधन

Archana Banage

काँग्रेसमुक्त भारत शक्य नाही- शरद पवार

Abhijeet Khandekar

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे सोमवारी आंदोलन

Patil_p