Tarun Bharat

कोरोना काळात जनजागृती केलेल्या लोककलावंतांना अर्थसहाय्य

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

राज्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील पात्र समुह, फड, संस्था व पथके यांना कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याकरीता संबंधीतांना येत्या 10 दिवसाच्या आत अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. हे अर्ज विहित नमुन्यातील पाठवायचे असुन ते संचालनालय, मुंबई या मुख्यालयात किंवा पुणे / नागपूर /औरंगाबाद येथील विभागील कार्यालयामार्फत अर्ज सादर करावयाचे आहेत.

संबंधित अर्जदार हे कंपनी कायदा किंवा सोसायटी कायदा अथवा विश्वस्त कायद्यांतर्गत किंवा एम.एस.एम.ई नोंदणीचे प्रमाणपत्र असावे. तसेच कलेवरच गुजराण असल्याचे तसेच एकरकमी कोव्हिड दिलासा पॅकेजचा लाभ घेणार नसल्याचे व दिलेली माहिती खोटी आढळल्यास शासनाच्या अनुदान योजनेतून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल हे माहित असल्याचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र अर्जासोबत पाठवावे. शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, संगीतबारी, तमाशा, टुरिंग टॉकीज, सर्कस, विधिनाटय़ पथकांसाठी पथकाने आर्थिक वर्ष 2017-18 पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान 50 कार्यक्रमांचे सादरीकरण केले असल्याबाबतची किमान 50 आयोजकांची पत्रे, हँडबिल, पत्रिका, वर्तमानपत्रातील जाहीरात, बातमी, ग्रामसेवक, सरपंच यांचे कार्यक्रम सादर केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.

तसेच नाटय़संस्थांसाठी आर्थिक वर्ष 2017-18 पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान 30 प्रयोग केल्याचे नाटय़गृह, भाडेपावती, जाहीरात, तिकीटे हे पुरावे जोडणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत संस्था ही एम.एस.एम.ई अंतर्गत जोडलेली असावी. तसेच मागील 5 वर्षापासून संस्था कार्यरत असावी. संस्थांनी आर्थिक वर्षात सन् 2017-18, 2018-19, 2019-20 या 3 वर्षात कार्यक्रमांचे / प्रयोगाचे सादरीकरण केलेले असावे. तसेच सदरची अर्ज करण्याची प्रक्रिया ही विनामुल्य असून अर्ज भरून घेण्यासाठी शासनाने कोणत्याही खासगी व्यक्ती, संस्था, संघटना यांची नेमणूक केलेली नाही. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी https://www.mahasanskruti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Stories

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा बळी

datta jadhav

रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम व जागता पहारा

Patil_p

वाईच्या नगराध्यक्षा पदावरून पायउतार

Amit Kulkarni

तपास अधिकाऱयांना अडकवून तो देखील अडकला

Patil_p

धक्कादायकः तब्बल 38 बळी

Patil_p

तेजोमय इतिहासाचा साक्षीदार किल्ले सज्जनगड मशालोत्सवाने उजळला

datta jadhav
error: Content is protected !!