Tarun Bharat

कोरोना काळात नियमांचे अनुकरणीय पालन

Advertisements

इटलीच्या नोर्टोसे भागात केवळ 2 जणांचे वास्तव्य : अंतर राखूनच घेतात परस्परांची भेट : मास्क लावणे विसरत नाहीत

जगभरात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या नियमाला हरताळ फासणाऱया देशांसाठी इटलीचे नोर्टोसे हे एक उदाहरण ठरले आहे. या भागात केवळ 2 लोक राहतात. तरीही दोघेही अत्यंत कठोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात आणि मास्कचा वापर कधीच विसरत नाहीत. दोन्ही नागरिक निवृत्त आहेत.

जियोवेनी केरिली (82 वर्षे) आणि जियामपीरो नोबिली (74 वर्षे) सदैव मास्क वापरतात. भेट होतानाही किमान एक मीटरचे अंतर राखतात. त्यांचा कुणीच शेजारी नाही, तसेच ते क्वचितच शहरातून बाहेर पडतात. नोर्टोसे भाग नेरिना व्हॅलीपासून सुमारे 900 मीटर उंचीवर असून तेथे पोहोचणेही सोपे नाही.

मास्क नसल्यास 1.21 लाखांचा दंड

इटलीत तुम्ही घरात असा किंवा बाहेर मास्क आणि एक मीटरचे सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. मास्क न लावल्यास तेथे 48 हजारांपासून 1.21 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जातो. महामारीच्या या काळात लागू झालेले नियम न मानणे म्हणजे देशाची मान खाली घालायला लावणे आहे. प्रकृतीच्या दृष्टीनेही या नियमांचे पालन आवश्यक असल्याचे नोबिली याबद्दल सांगतात.

90 च्या दशकात भूकंप

90 च्या दशकात नोर्टोसेमध्ये सातत्याने भूकंप होत होते आणि त्यात या भागाचे प्रचंड नुकसान झाले. यातून येथील लोक कामाच्या शोधार्थ रोम आणि इतर शहरात निघून गेल्याचे नोबिली यांनी म्हटले आहे. कॅरिली स्वतःचे पाळीव श्वान आणि मेंढय़ासह बाहेर पडल्यावर त्यांची नोबिली यांच्याशी भेट होते.

एकच रस्ता तोही निर्जन

नोर्टोसेला शहराशी जोडणारा एकच रस्ता असून तेथून कोणीच जात नाही. रस्त्यावर केवळ नेर्टोसे येथे येऊ इच्छिणारे लोकच दिसून येतात. तर स्वतःच्या मूळ गावी काही काळ घालवू इच्छिणारे लोक उन्हाळय़ाच्या सुटीत दिसून येतात. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला हा भाग वास्तव्यासाठी अथांगसुंदर आहे.

हॉटेल, बाजारपेठ नाही

नोर्टोसे येथे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिनी-मार्केट देखील नाही. आवश्यक सामग्रीच्या खरेदीसाठी शहरात जावे लागते. आम्ही येथे सामान्य जीवन जगतो, येथे शांतता, ताजी हवा आणि स्वच्छ झऱयाचे पाणी आहे. शहरात जावे लागल्यावर आजारी झाल्याचे वाटू लागते, शहरातील गोंगाट नकोसा होतो असे केरिली म्हणाले. येथील राहणीमान अत्यंत सुंदर आहे, परंतु येथे डॉक्टर तसेच फार्मसी देखील नाही.

Related Stories

पाकिस्तानात कोरोनाची तिसरी लाट; 7 शहरांमध्ये कडक लॉकडाऊन

datta jadhav

युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करणार नाही ः रशिया

Patil_p

चीनला परिणाम भोगावे लागणार : डोनाल्ड ट्रम्प

prashant_c

नेपाळमध्ये 18 मेपर्यंत टाळेबंदी

Patil_p

अफगाणिस्तानात दोन वेगवेगळ्या स्फोटात 5 ठार

datta jadhav

कॅनडातील शाळेत आढळली स्मशानभूमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!