Tarun Bharat

कोरोना काळात मुकेश अंबानींचा मदतीचा हात ; ऑईल फॅक्टरीत ऑक्सिजन निर्मिती, मोफत पुरवठा


मुंबई \ ऑनलाईन टीम


देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी धावले आहेत. त्यामुळे आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिफायनरीजमधून रुग्णालयांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जाणार आहे.

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तेल कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानींच्या गुजरातमधील जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहे. यात थोडसे बदल केल्यानंतर या ठिकाणी वापरला जाणारा औद्योगिक ऑक्सिजन हा मेडिकलसाठी उपयुक्त ऑक्सिजन म्हणून वापरला जाऊ शकतो. हा ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यात पुरवठा केला जाऊ शकतो.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे. “रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल,” अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.रम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याबाबत मागणी केली होती.

Related Stories

राज्यातील जनतेसाठी आनंद वार्ता

Patil_p

जिल्हय़ात विविध ठिकाणी अवैध दारु अड्डय़ांवर छापे

Patil_p

मोठी बातमी : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

Archana Banage

आर्यन खानसाठी जुही चावला बनली जामीनदार

datta jadhav

खा. सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; सुदैवाने अनर्थ टळला…

datta jadhav

दगड काळजावर की डोक्यावर ठेवावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न

datta jadhav