Tarun Bharat

कोरोना चाचणी अहवाल आता मिळणार ऑनलाईन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीत आता कोरोना तपासणी अहवाल ऑनलाईन मिळणार आहे. जिल्हा रूग्णालयातील डॉ. सुतार यांनी यासाठी एक यंत्रणा तयार केली असून याव्दारे आता आरटीपीसीआर व ऍन्टीजेन तपासणी अहवाल ऑनलाईन मिळणार आहेत.

ऑनलाईन अहवाल सर्व कारणांसाठी वैध दस्तऐवज असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. बुधवारपासन याची अंमलबजावणी सुरू झाली असून बुधवारी केलेल्या चाचणीचे अहवाल ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. कोरोना चाचणीनंतर अहवाल वेळेत मिळत नाही किंवा त्यासाठी रांग लावावी लागत होती. मुळात कोरोना चाचणीचे प्रमाण चार पटीने वाढल्याने अहवाल येण्यास काहीसा वेळ लागत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा कोरोना सेंटरमधील डॉ. सुतार यांनी ही यंत्रणा तयार केली आहे. यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर करून घेतले जाणार आहेत.

           दोन हजाराहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात

जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली आहे. या रूग्णांसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय, महिला रूग्णालयाबरोबरच डेडिकेटेड कोरोना रूग्णालये व कोरोना केअर सेंटर येथील खाटाही अपुऱया पडू लागल्या आहेत. यामुळे आता ज्या रूग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये रहाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हय़ात सध्या होम आयसोलेशनमध्ये दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण आहेत. मात्र अजिबातच लक्षणे नसलेले काही रूग्ण घराबाहेर फिरत असल्याने त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोकाही वाढला आहे.

रत्नागिरीत लसीकरणासाठी करावी लागणार पूर्वनोंदणी 

रत्नागिरी शहरातील कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाबाबत पूर्वनोंदणी अत्यावश्यक करण्यात आली आहे. बुधवारी या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला असून आता ऑनलाईन नोंदणीनंतरच लसीकरण होणार आहे.

 बुधवारी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे 22 एप्रिलपासून शहरातील लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस मिळणार नाही. लस घेऊ इच्छिणाऱया नागरिकांना आता ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधितांना मेसेज येईल. त्यानंतरच त्याने त्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर जायचे आहे. हा निर्णय फक्त शहरी भागातील लसीकरण केंद्रासाठीच असून यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात उद्या राजमाता पार्वतीदेवी यांची जयंती

Anuja Kudatarkar

तोंड उघडले तर बंगेंचे वस्त्रहरण होईल!

NIKHIL_N

परवानगी प्राप्त नागरिकांसाठी आठ जिल्हयांमध्ये 25 एस.टी. ची व्यवस्था

Archana Banage

‘युगानुयुगे तूच’ नागरिकांच्या हातात देण्याची ‘हीच ती वेळ’; कवी कांडरांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Archana Banage

नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी – कांग्रेस आघाडी!

Archana Banage

रत्नागिरीच्या माजी सभापतींचा जाळून खून केल्याचे उघडकीस

Patil_p
error: Content is protected !!