Tarun Bharat

कोरोना चाचण्यांचा अहवाल विलंबाने दिलेल्या 40 लॅबना दंड

प्रतिनिधी / बेंगळूर

कोरोना चाचणीचा अहवाल देण्यास विलंब केल्याने राज्यातील 40 लॅबोरेटरिजना सुमारे 20.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये 31 खासगी आणि 9 सरकारी लॅबोरेटरिजचा समावेश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्व लॅबोरेटरिजना कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासांत देण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, काही लॅबनी अहवाल देण्यास विलंब केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 8 मे पासून अशी कारवाई केली जात असून आतापर्यंत 10,103 स्वॅबचा अहवाल येण्यास विलंब झाला आहे. यामध्ये सरकारी लॅबमधून 3,031 व उर्वरित खासगी लॅबमधील स्वॅबचा रिपोर्ट येण्यास विलंब झाला आहे. प्रत्येक स्वॅबमागे 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

कर्नाटक: येडियुरप्पा सरकारवर कुमारस्वामींची टीका

Archana Banage

सुभेदार काशिनाथ नायक यांना 10 लाखांचे बक्षीस

Amit Kulkarni

बेंगळूर: बीएमटीसीचा शनिवार-रविवार १,२०० बसेस चालविण्याचा निर्णय

Archana Banage

कर्नाटकमध्ये बस पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड

Archana Banage

‘आधार’ नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लवकरच लसीकरण

Amit Kulkarni

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

Patil_p