Tarun Bharat

कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

Advertisements

शहरात विनाकारण फिरणाऱयाची कोरोना टेस्ट

प्रतिनिधी/ सातारा

 जिह्यात दररोज बाधित आढळून येणाऱयांची संख्या 600 ते 700 च्या दरम्यान आहे. तपासण्या दररोज 10 ते 11 हजाराच्या दरम्यान होत आहेत. रविवारी जाहीर केलेल्या अहवालात 657 जण बाधित आढळून आले तर 20 जणांचा कोरोनाने बळी घेतला. जिह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 6.05 एवढा आहे. दिलासादायक म्हणजे आढळून आलेल्या बाधित संख्येपेक्षा जास्त 120 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

सातारा शहरात तपासणी वाढवली

बाधितांचा सातारा शहरातला आकडा कमी आहे. परंतु बाहेरून येणाऱया रुग्णामुळे संख्या वाढती दिसत आहे. शहरात आरोग्य विभाग आणि सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी केली जात आहे. दररोज 300 जणांचे स्वॅब तपासणी केले जात असून त्यात एक ते दोन जण बाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात ही बाधित संख्या नियंत्रणात आणण्यास तालुक्यातील आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे.

आतापर्यंत जिह्यातील 15 लाखच्या समीप तपासण्या

जिह्यातील 11 तालुक्याची लोकसंख्या 35 लाख एवढी आहे. त्यापैकी कोरोना तपासणी 14 लाख 92 हजार 855 जणांच्या करण्यात आलेल्या आहेत. जिह्यात 71 प्राथमिक आरोग्य केंद्र, 400 उपकेंद्रे, 11 ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयाकडून कोरोना तपासणी करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होत असतात. दररोज सुमारे 10 ते 11 हजार स्वाब तपासणी केली जात आहे.

657 कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू

सातारा जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 657 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 11 (9489), कराड 178 (35975), खंडाळा 19 (13304), खटाव 73 (22284), कोरेगांव 55 (19585), माण 35 (15259), महाबळेश्वर 2 (4537) पाटण 16 (9697), फलटण 103 (31853), सातारा 117 (46352), वाई 40(14660) व इतर 8(1696) असे आज अखेर एकूण  224691 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज 20 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5453 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

777 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 777 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Related Stories

राम शिंदेंना धक्का; जामखेडमध्ये भाजपला खिंडार

Archana Banage

गुरुदत्त कारखान्यासमोर शेकडो परप्रांतीय कामगारांचा मोर्चा

Archana Banage

ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरु; मतमोजणी थांबवताच संजय राऊत संतापले

Archana Banage

शिंदे गटानं संपर्कात असलेल्या खासदारांची नावं जाहीर करावी-अरविंद सावंत

Abhijeet Khandekar

परराज्यात मजूर पोहचले ; काही मार्गस्थ

Archana Banage

सांगली : लॉकडाऊननंतरची तरुणाई आर्थिक शिस्त व सामाजिक भान असणारी असेल – प्रा. ठिगळे

Archana Banage
error: Content is protected !!