Tarun Bharat

कोरोना टाळण्यासाठी खबरदारी गरजेची

पी. बी. देवमाने यांचे आवाहन : बोरगाव, बेडकिहाळ येथे कोरोना जागृती उपक्रम

वार्ताहर / बोरगाव, बेडकिहाळ

नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कोरोना टाळण्यासाठी खरदारी घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग स्थब्ध झाले असून त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनावश्यक बाहेर फिरण्याचे टाळावे, असे आवाहन बोरगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पी. बी. देवमाने यांनी केले.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खाते, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संवहन परिषद, विकसन केंद्र बेळगाव, नगर पंचायत बोरगाव यांच्या संयुक्त आश्रयाखाली बोरगाव येथे आयोजित कोरोना जागृती उपक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. नगराध्यक्ष संजय ऐदमाळे यांच्या हस्ते जागृती जथ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॅनरा बँकेचे कौन्सलर विजय वाघमारे यांनी नागरिकांनी आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे. कोरोनाची भीती बाळगू नका. पण खबरदारी घेणे आवश्यक आहे. धैर्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी योगासने, पौष्टिक आहाराचे सेवन, लसीकरण, नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी शहरातून कोरोना जागृती रॅली काढण्यात आली. तसेच आशादीप समुदाय कलाकेंद्राच्या कलाकारांनी जागृती पथनाटय़ सादर केले. यावेळी उपनगराध्यक्षा नजीमा मुजावर, नगरसेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.

बेडकिहाळमध्ये कोरोना जनजागृती अभियान

 विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार व राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संवहन मंडळ नवी दिल्ली यांच्यावतीने आणि ग्रामपंचायत बेडकिहाळ तसेच रंगदर्शन कलामंच धुळगणवाडी यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंध आणि लसीकरण याबाबत सर्वसामान्य जनतेस माहिती देताना जनजागृती कार्यक्रम बेडकिहाळ येथे पार पडला. बेडकिहाळ ग्रा.पं. परिसरात जनजागृती मोहिमेचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांनी हलगी वाजवून  केले. तर अध्यक्षा मेघा मोहिते यांनी हिरवा झेंडा दाखवून चालना दिली. स्वागत रंगदर्शन कलामंडळाचे प्रमुख भरत कलाचंद यांनी केले. अध्यक्षा मेघा मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या कोरोनाबाबत खबरदारीपर भित्तीपत्रक व फलक घेऊन मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जनजागृतीच्या घोषणा देत मार्गावरून फेरी काढण्यात आली.

Related Stories

टिळकवाडी येथे रेल्वे पुन्हा थांबली

Rohit Salunke

महादेव माने यांना विवेक सेवा सन्मान पुरस्कार

Patil_p

बाबुराव शिंदोळकर यांचा काकडे फौंडेशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni

उड्डाणपुलांच्या देखभालीकडे कानाडोळा

Omkar B

शेडबाळ-बेळगाव रेल्वेचा शुभारंभ

Patil_p

सीमाप्रश्नावरील सुनावणी लांबणीवर

Abhijeet Khandekar