Tarun Bharat

कोरोना टेस्ट : भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाचे निदान काही मिनिटांत करण्यासाठी भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक एकत्रितपणे चार नवीन पद्धतीचा शोध घेत आहेत. त्यासाठी इस्रायलच्या वैज्ञानिकांचे एक पथक या आठवड्यात दिल्लीतील AIIMS येथे दाखल होणार आहे. भारतातील इस्रायलचे राजदून रॉन मलकिन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक कोरोना निदानासाठी चार वैज्ञानिक पद्धतींचा अभ्यास करणार आहेत. पहिल्या कोरोना तपासणीच्या पहिल्या पद्धतीत पॉलीमिनो ॲसिडचा वापर केला आहे. त्यामुळे 30 कोरोनाचे निदान होणार आहे. ही पद्धत इस्रायलमध्येच तयार करण्यात आली आहे. दुसऱ्या पद्धतीत एक स्वस्त बायोकेमिकल तपासणी आहे. ही घरी सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळेही 30 मिनिटांत कोरोनाचे निदान होऊ शकते.

तिसरी पद्धत ही अनोखी आहे. या पद्धतीत टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करुन कोणत्याही व्यक्तीचा आवाज ऐकून कोरोनाचे निदान केले जाणार आहे. तर चौथ्या पद्धतीत एक व्यक्ती ट्यूबमध्ये श्वास घेईल. ती ट्यूब एका मशीनमध्ये टाकून टेराहर्टज रेडिओ फ्रीक्वेन्सी आणि एका ॲल्गोरिथ्मचा वापर करुन कोरोनाचे निदान केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि इस्रायलचे वैज्ञानिक दानी गोल्ड हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत.

Related Stories

पाकिस्तान कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा फेरविचार करणार

datta jadhav

आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना

Archana Banage

आयएएस पूजा सिंघल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी निलंबित

Abhijeet Khandekar

चंद्रकांतदादांचा मविआला सल्ला; म्हणाले,आमच्याशी चर्चा करून…

Archana Banage

संयुक्त राष्ट्रसंघाने आता हिंदूफोबियाचा विरोध करावा

Patil_p

छोटा राजनची कोरोनावर मात; एम्समधून पुन्हा तिहारमध्ये रवानगी

datta jadhav