Tarun Bharat

कोरोना थोपविण्यासाठी घरातच नमाज अदा करा

अंजुमन, मुस्लीम धर्मगुरुंच्या बैठकीत अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक भास्करराव यांचे आवाहन : 7 अधिकाऱयांची नियुक्ती

प्रतिनिधी / बेळगाव

बेंगळूर येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे एखाद्याला लवकरात लवकर उपचार मिळविणे तेथे कठीण जात आहे. बेळगावात अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी प्रत्येकांनी खबदारी बाळगणे गरजेचे आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. कोरोना महामारीचा फैलाव टाळण्यासाठी मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा करावे, असे आवाहन अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक भास्करराव यांनी केले आहे.

शुक्रवारी दुपारी येथील अंजुमन हॉलमध्ये अंजुमन इस्लामचे पदाधिकारी व मुस्लीम धर्मगुरु व समाजातील प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त मुत्तुराज आदी वरि÷ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने सात पोलीस अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. भास्करराव यांची बेळगाव उत्तर विभागासाठी नियुक्ती झाली आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोटसह उत्तर विभागातील जिल्हय़ांचा आढावा घेण्यासाठी ते बेळगावला आले आहेत. ते सध्या रेल्वे विभागाचे एडीजीपी आहेत.

जनतेला मार्गदर्शन करा

समाजाचे प्रमुख व धर्मगुरुंनी जर पुढाकार घेऊन जनतेला मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर करणे या तीन प्रमुख गोष्टींविषयी मार्गदर्शन केले तर सर्वसामान्य लोक ऐकतात. केवळ कायद्याने किंवा दमदाटी करून काही साध्य करता येणार नाही म्हणून सध्याची परिस्थिती लक्षात घेवून मुस्लीम धर्मगुरुंनी समाजाला, आपल्या कुटुंबीयांना कोरोनापासून वाचविण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन भास्करराव यांनी केले.

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. प्रत्येकांनी आपापल्या घरातच नमाज करावे. शासकीय नियमांनुसार मशिदीत केवळ पाच जणांना नमाज अदा करण्यासाठी मुभा आहे. आपापल्या कुटुंबाला वाचवायचे असेल तर अनावश्यकपणे घराबाहेर कोणीही फिरु नये. सरकारने कोरोना थोपविण्यासाठी जारी केलेल्या मार्गसूचींचे प्रत्येकांनी पालन करावे. कारण प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे, त्यांचा जीवनगाडाही चालला पाहिजे. म्हणून सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याला सहकार्य करण्याचे आवाहन भास्करराव यांनी केले आहे.

यावेळी अंजुमनचे अध्यक्ष आसिफ ऊर्फ राजू सेठ, मुफ्ती अब्दुल अजीज, मौलाना साजिद, मौलाना तनवीर, मुफ्ती कासिम, मौलाना नजीरुल्ला, वक्फ बोर्डचे चेअरमन गफुर घीवाले, सेपेटरी समीउल्ला माडीवाले, अफजल टीनवाले, अश्फाक घोरी, फईम नाईकवाडी, बाबुलाल मुजावर, अमजद मोमीन, अर्षद मोमीन आदी उपस्थित होते.

गरिबांना मास्क वाटप करा

अनेकांना मास्क खरेदी करणेही शक्मय नाही. त्यामुळे ज्यांना शक्मय आहे त्यांनी गरिबांना मास्क वाटप करावे. अन्नधान्यांचे वाटप करावे. जेणेकरून प्रत्येक माणूस जगला पाहिजे. मानवता टिकली पाहिजे. ही संकटाची वेळ आहे. त्यामुळे गोर-गरिबांसाठी मदतीचे हात पुढे करावे, असे आवाहनही भास्करराव यांनी केले.

Related Stories

डॉक्टर्स डे साजरा

Patil_p

स्मार्ट सिटीतील नागरिकांना साकवाचा आधार

Patil_p

रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद वैद्य उद्या बेळगावात

Amit Kulkarni

शाकंभरी पौर्णिमा साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना

Patil_p

बेळवट्टी येथे ट्रक अपघातात युवक ठार

Amit Kulkarni