Tarun Bharat

कोरोना: दक्षिणेकडे कर्नाटकात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

बेंगळूर /प्रतिनिधी

दक्षिणेकडील राज्यांपैकी कर्नाटकात कोविड मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. केरळमध्ये सर्वात कमी प्रमाण आहे. तथापि, या पाच राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या अडीच टक्क्यांहून कमी आहे. २१ जुलै पर्यंत कर्नाटकात मृत्यूचे प्रमाण २.०६ टक्के आहे. एकूण ७१०६९ रुग्णांपैकी १४६४ रुग्ण मरण पावले आहेत. मंगळवार पर्यंत १८०६४३ रुग्णांपैकी २६२६ रुग्ण म्हणजेच १.४५ टक्के मरण पावले आहेत.

मंगळवारी सायंकाळपर्यंत तेलंगणमध्ये एकूण ४७७०५ रूग्णांची तपासणी झाली असून यातील ४२९ म्हणजेच ०.८९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील एकूण ५८६६८ रूग्णांपैकी ७५८ रुग्णांना म्हणजेच १.२९ टक्के वाचवता आले नाही. त्या सर्वांमध्ये केरळ हे सर्वोत्कृष्ट राज्य आहे. एकूण १३९९४ रूग्णांपैकी ४४ रुग्ण म्हणजेच ०.३१ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मरण पावलेली ७० टक्के लोक आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त होते.

२१ दिवसांत ५५८२५ नवीन रूग्ण, १२२३ मरण पावले

कर्नाटकसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून चाचणी क्षमता दोन ते तीन पट वाढली आहे. चिकित्सकांच्या मते साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी क्षमता वाढवावी लागेल. मृत्यूचे प्रमाण एक टक्क्याने कमी करावे लागेल. कोविड वॉर रूमचे कार्यवाहक नोडल अधिकारी, मुनीश मौदगिल यांनी १ ते २१ जुलै दरम्यान कर्नाटकात कोरोनाचे ५५८२५ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १२२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती दिली आहे.

Related Stories

यल्लापूरमध्ये अपघातात दोन महिला ठार

Amit Kulkarni

संवेदनेतून साहित्याची निर्मिती

Patil_p

मौलाना सिद्दीकी यांना खोटय़ा आरोपाखाली अटक

Amit Kulkarni

सावरकर रोड, टिळकवाडी येथे पाणी वाया जात असल्याने नाराजी

Patil_p

माजी मंत्री विनय कुलकर्णींची जामीन याचिका फेटाळली

Amit Kulkarni

दोनपेक्षा अधिक बाधित असल्यास घर सीलडाऊन

Amit Kulkarni