ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 576 नवे रुग्ण आढळून आले. तर, दिल्लीतील संसर्गाचा दरात घट झाला असून 0.78 % इतका झाला आहे. कालच्या दिवसात 103 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 1,287 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत राज्यात 9,364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 27 हजार 439 वर पोहोचली आहे. त्यातील 13 लाख 93 हजार 673 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,402 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- मागील 24 तासात 50,658 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 50,658 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 33,758 जणांना पहिला डोस तर 16,900 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 54 लाख 60 हजार 805 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 42,19,712 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 12,41,093 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.
- ब्लॅक फंगसच्या रुग्णात लक्षणीय वाढ!
दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असली तरी देखील ब्लॅक फंगसची वाढती रुग्ण संख्या ही सरकारसमोर चिंतेचा विषय बनला आहे. आता पर्यंत ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या एक हजारच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे ब्लॅक फंगसच्या औषधांचा साठा वाढवण्याची मागणी केली आहे.