Tarun Bharat

कोरोना : दिल्लीत 677 नवे रुग्ण ; 21 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत काल 677 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 24 हजार 795 वर पोहचली आहे. यामधील 5,838 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 940 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 08 हजार 434 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,523 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 85 लाख 78 हजार 080 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 44,221 आरटीपीसीआर टेस्ट आणि 40,459 रैपिड एंटिजेन टेस्ट शनिवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

सपा नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

datta jadhav

आरक्षणासाठी गुर्जर समुदाय आंदोलनाच्या पवित्र्यात

Patil_p

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू

datta jadhav

मान्सूनचे आगमन लांबणीवर

datta jadhav

दिल्लीच्या शेतकऱ्याने शोधला ‘पराली’वर उपाय

Patil_p

हिंदू दलित पतीचे मुस्लीमांकडून ‘ऑनरकिलींग’

Amit Kulkarni