Tarun Bharat

कोरोना : निधीसाठी भारत – पाकिस्तान मालिका खेळवा : शोएब अख्तर

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. पाकिस्तान मध्ये देखील या संकटामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परीनं मदत निधी उभारत आहेत. यातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ने भारत – पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांची मॅच ठेवण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

 याबाबत माहिती देताना शोएब म्हणाला,  संपूर्ण जगभरात कोरोना वाढत चालला आहे. लॉक डाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार देखील बंद आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लढ्यास निधी जमा करण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवावी. आणि यातून जमा झालेला निधी दोन्हीं देशांनी कोरोना विरुद्ध लढ्यासाठी वापरावा. 

या सामन्याचा निकाल काय लागतो हे महत्त्वाचे नसावे. निकाल काही लागला तरी दोन्ही देशातील क्रिकेप्रेमींना दुःख होणार नाही. भारताकडून कोणी शतक मारले, तर पाकिस्तानला खुशी झाली पाहिजे आणि पाकिस्तान कडून कोणी चांगले खेळले तर भारत आनंदी झाले पाहिजे.

तसेच परिस्थिती नियंत्रणात आल्यास दुबई सारख्या त्रयस्थ ठिकाणी सामने खेलवावेत, असे ही त्याने यावेळी सांगितले. तसेच या मालिकेमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारू शकतात. अशा संकटप्रसंगी दोन्हीं देशांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, असं ही तो यावेळी म्हणाला. 

Related Stories

‘हापूस’ आला रे…मुहूर्ताचा दर ४ हजार

Abhijeet Khandekar

अंबानी अन् त्यांच्या कुटुंबाला मिळत राहणार सुरक्षा

Amit Kulkarni

‘वंदे मातरम्’ आदेशावरून मुनगंटीवारांचा यूटर्न

Archana Banage

कोल्हापूर : गोकुळ दूध दरवाढीचा निर्णय तुर्तास लांबणीवर

Archana Banage

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे-छगन भुजबळ

Archana Banage

मुलायम यादवांच्या सुनेकडून राम मंदिर उभारणीसाठी देणगी

Patil_p
error: Content is protected !!