Tarun Bharat

कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी : कुमारस्वामी

Advertisements

बेंगळूर : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून न देताच संसर्गाच्या नियंत्रणासाठी सरकारने कोणतीही बैठक घेतली तरी त्याच्या काय उपयोग?, असा परखड प्रश्न माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उपस्थित केला आहे. कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरले असून आता वेळ निघून गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कोरोना नियंत्रणासंबंधी राज्यात कठोर नियम जारी करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. यासंदर्भात कुमारस्वामी यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल ट्विटरवरून टीका केली. संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आणि रुग्णांवर उपचारासाठी पायाभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारला कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळाले होते. त्यांनी ही बाब गंभीरपणे विचारात घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. कोरोना रुग्णांना उपचार मिळण्याची हमी नाही. केंद्र सरकारने रेमडेसिवीरची मनाला वाटेल तशा पद्धतीने निर्यात केली आहे. त्यामुळे देशात या लसीचा तुटवडा भासत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे देशातील इस्पितळांना रेमडेसिवीरसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे, असे ट्विटही त्यांनी केले आहे.

Related Stories

कर्नाटक: मंत्रिमंडळाची नवीन आयटी धोरणाला मंजुरी

Abhijeet Shinde

कर्नाटक: अभियांत्रिकी महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडे ३० टक्के फी वाढीची मागणी

Abhijeet Shinde

ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्याची बदली करा

Rohan_P

कर्नाटक: दिल्लीत प्रथम यात्री निवास बांधा : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

राज्याला ब्लॅक फंगसवरील 9,750 वायल्स उपलब्ध

Amit Kulkarni

कर्नाटक: खासदार अनंतकुमार हेगडे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!