Tarun Bharat

कोरोना नियमांचे पालन करून बी-बियाणांची खरेदी करा

बेळगाव / प्रतिनिधी

खरीप हंगामाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन शेतकऱयांना सवलतीच्या दरात बी-बियाणे व अवजारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी दिली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱयांनी सामाजिक अंतर राखूनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. 

यंदा पेरणी क्षेत्र वाढणार असून 7.16 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे. अवकाळी पाऊस दमदार झाल्याने यंदा खरीप हंगामातील पेरण्या लवकर होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. याला शेती व्यवसायदेखील अपवाद नाही. गतवषी पावसाळय़ात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच आता लॉकडाऊनमुळे शेतकऱयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

बेळगाव तालुक्मयात काकती, उचगाव, हिरेबागेवाडी आदी ठिकाणी रयत संपर्क केंदे आहेत. नंदिहळळी, बेळगुंदी, मारीहाळ, मुत्नाळ, मोदगा, हलगा, भेंडीगेरी, के. के. कोप्प, बडाल अंकलगी आदी ठिकाणी कृषी पत्तीन संघ आहेत. या ठिकाणी भात, सोयाबीन व इतर बी-बियाणांचे वाटप केले जाणार असून शेतकऱयांनी कोरोना नियमांचे पालन करून खरेदी करावी, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

परप्रांतीयांना सोडण्यासाठी बसेस सज्ज

Patil_p

बँक ऑफ इंडियाच्या कडोली शाखेला टाळे

Amit Kulkarni

लायन्स क्लबतर्फे प्रदूषण नियंत्रणाबाबत जागृती

Patil_p

कोरोनाचे नियम होणार आणखी कठोर

Patil_p

शाळा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

Omkar B

पंतप्रधान माघारी परतताच घड्याळानेही बदलला वेळ!

Amit Kulkarni