Tarun Bharat
डॉ. कादंबरी बलकवडे

कोरोना नियम तोडणाऱ्या 1961 जणांना दणका

आठवड्यात 2 लाख 73 हजार रूपयांचा दंड वसूल  

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरने, रात्री 9 नंतर आस्थापना सुरु ठेवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी नियमभंग करणाऱ्या 1 हजार 961 नागरिकांना  महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांनी दणका दिला आहे. आठवडाभरात केलेल्या कारवाईत या सर्व नागरिकांकडून 2 लाख 73 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

16 ते 22 ऑक्टोबर काळात ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाने 1961 जणांकडून वसूल केलेल्या 3 लाख 73 हजार 500 रुपयांच्या दंडामध्ये 16 ऑक्टोबर रोजी  209 जणांकडून 33 हजार 600 रूपये,   17 ऑक्टोबर रोजी 243 जणांकडून 39 हजार 400 रूपये, 18 ऑक्टोबर रोजी 364 जणांकडून  50 हजार 400 रूपये, 19 ऑक्टोबर रोजी 230 जणांकडून 32 हजार 100 रूपये, 20 ऑक्टोबर रोजी 243 जणांकडून 33 हजार 100 रूपये आणि 21 ऑक्टोबर रोजी 326 जणांकडून 38 हजार 700 रूपये, 22 ऑक्टांबर रोजी 346 जणांकडून 46 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई

नियमभंग               नागरिक                       दंड

विनामास्क फिरणारे     1620    –  1 लाख 62 हजार  सामाजिक अंतर न ठेवल्याबद्दल    112    65 हजार 400 रूपये

मास्क व हॅण्डग्लोज न वापरणे   –   197   39 हजार 400 रूपये

रात्री 9 नंतर दुकान सुरू ठेवणे 1   –     500 रूपये

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे    31   –    6 हजार 200 रूपये

कोरोना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहे. सद्यः कोरानाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही. नागरिकांनी दसरा, दिवाळी सणामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

 डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त,कोल्हापूर महापालिका

Related Stories

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५ कोटी मंजूर

Abhijeet Khandekar

उजळाईवाडीतील हॉस्पिटलने बिलासाठी १४ तास बॉडी अडविली

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीत भटक्या कुत्र्याचा दोन बालकांवर हल्ला

Archana Banage

गोकुळ दूध संघाची पशुखाद्य दरवाढ अपरिहार्य – विश्वास पाटील

Archana Banage

Kolhapur : यड्रावकरांनी गद्दारी केली, पण आता जातीवर मतदान नको- सुषमा अंधारे

Abhijeet Khandekar

कसबा सांगाव येथे दुधगंगा डावा कालवा परिसरात अनधिकृत खोदकाम

Archana Banage