Tarun Bharat

कोरोना परिस्थितीः केंद्रीय पथकाने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची घेतली भेट

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकारी पथकाने मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बेंगळूरु येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रीय पथकाने मुख्यमंत्री आणि राज्यातील अधिकाऱ्यांशी कोरोना परिस्थिती विषयी चर्चा केली. तसेच साथीच्या रोगासंदर्भात राज्याने दिलेल्या माहितीवरून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रणनीती बनविण्यासंदर्भात चर्चा चर्चाही केली.

यावेळी या बैठकीला केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे, आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती अहुजा, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभागाचे संचालक डॉ. पी. रवींद्रन, कर्नाटकचे मुख्य सचिव टीएम विजय भास्कर, वैद्यकीय शिक्षण मंत्री सुधाकर के, आणि आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु आदी या बैठकीत सहभागी होते.

Related Stories

विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत बेळगाव उपविजेता

Amit Kulkarni

दहावीच्या निकालातील घसरण भरून काढण्यासाठी प्रयत्न आवश्यक

Amit Kulkarni

स्वामी समर्थ भक्त परिवारातर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

मजगाव येथील गाडे यात्रेला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

नवनिर्वाचित नगरसेवक-अधिकाऱयांची ओळख परेड

Amit Kulkarni

बसस्थानकात भटक्मया कुत्र्यांचा वावर

Patil_p