Tarun Bharat

कोरोना : पाटणामध्ये आणखी 7 दिवस लॉक डाऊन

ऑनलाईन टीम / पाटणा : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आता शहरात आणखी 7 दिवस म्हणजेच 10 ते 16 जुलै पर्यंत लॉक डाऊन असणार आहे. 


याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी कुमार रवी यांनी सांगितले की, बाजारात होणारी अनावश्यक गर्दी पाहून पाटणा शहरात आणखी एक आठवडा लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे. या लॉक डाऊनमध्ये आवश्यक सुविधा पाहिल्या प्रमाणेच सुरू राहतील. तर धार्मिक स्थळे बंद असतील. मास्क न लावता गाडीवरून फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


– भागलपूर जिल्ह्यात आणखी 5 दिवस लॉक डाऊन


यासोबतच बिहार मधील भागलपूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 5 दिवस म्हणजेच 9 ते 13 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात केवळ आवश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवली जाणार आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात बिहारमध्ये 749 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 13274 वर पोहोचली आहे. 

Related Stories

Ratnagiri Breaking:- माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा खून

Abhijeet Khandekar

मध्य प्रदेश : या जिल्ह्यातील नागरिकांनी लावला ‘सेल्फ लॉकडाऊन’

Tousif Mujawar

दुतावासातील 50 टक्के कर्मचारी कमी करा!

Patil_p

युक्रेनचे लष्करी विमान कोसळले; 22 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav

मासे सांगणार नदी प्रदूषणाची पातळी

Patil_p

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचार सभांसाठी केले ‘हे’ नवे नियम

Abhijeet Khandekar