Tarun Bharat

कोरोना पॉझिटिव्ह असूनही कुटुंबासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला केलं रुग्णालयात दाखल

हुक्केरी/प्रतिनिधी

राज्यात ७ जूनपर्यंत पूर्ण लॉकडाऊन आहे. तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत. दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या कुटुंबासोबत गाडीमधून फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला कुटुंबासहित रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान हुक्केरी शहरातील कोर्ट सर्कल येथे सीपीआय रमेश यांनी विनाकारण फिरणाऱ्या कारला अडवले असता गाडीतील व्यक्तीने आपण पॉझिटिव्ह असल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी सीपीआय रमेश यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आणि तात्काळ रुग्णालयात पाठविले.

राज्यात लॉकडाऊन असूनही लोक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. अशा व्यक्तींवर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. यावेळी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली असून काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Related Stories

आठवडय़ाला 174 विमानफेऱयांना मिळाली परवानगी

Patil_p

बळ्ळारी नाल्यापर्यंतच्या ‘त्या’ कालव्याचे काम मजुरांकडूनच

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात गुरुवारी 185 जणांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱयांचा एल्गार

Amit Kulkarni

लाभार्थी नवीन बीपीएल रेशनकार्डच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni

बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्यांना मोफत तांदूळ पुरवठा

Patil_p