Tarun Bharat

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची प्रकृती गंभीर

सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू

प्रतिनिधी/कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये सद्यस्थितीत 9 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी 328 जणांची तपासणी केली. तसेच 108 जणांना घरी पाठवण्यात आले. नवीन 35 रूग्ण दाखल झाले आहेत. अंतर्गत रूग्ण विभागात 117 जण उपचार घेत आहेत. कोरोना आयसोलेटेड वॉर्डमध्ये 9 पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दिवसभरात 106 स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 88 स्वॅब तपासले असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, जिल्हय़ात मंगळवारी सीपीआरमध्ये 397 जणांची तपासणी झाली. त्यापैकी 33 जणांचे स्वॅब घेतले. इचलकरंजीतील आयजीएम रूग्णालयात 40 जणांची तपासणी करून 16 जणांचे स्वॅब घेतले. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 43 जणांची तपासणी करून 26 स्वॅब घेण्यात आले. चंदगड ग्रामीण रूग्णालयात 16 जणांचे स्वॅब घेतले. ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये चौघांची तपासणी करून दोघांचे स्वॅब घेतले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 19 जणांची तपासणी करून तिघांचे स्वॅब घेतले. एकूण 450 जणांची तपासणी करून 190 जणांना दाखल करण्यात आले. तसेच 96 जणांचे स्वॅब तपासणीसाठी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Related Stories

कोल्हापूर : घरगुती वीज बिल भरणार नाही, संपूर्ण वीज बिल माफ होईपर्यंत आंदोलन सुरूच

Archana Banage

बल्लारपूर रेल्वे स्थानकातील पूल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Archana Banage

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही – अजित पवार

Abhijeet Khandekar

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान होतं : मंत्री नवाब मलिक

Archana Banage

सांगरुळ येथील कुमार विद्या मंदिरच्या चार एलईडी, टीव्ही संच चोरीस

Archana Banage

कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ यांच्याकडून ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप

Archana Banage