Tarun Bharat

कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्याने हॉटेल, सुपरमार्केट सील

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात दिवसागणिक कोरोनाची संख्या वाढत आहे. दररोज वाढणारी कोरोनाची संख्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बेंगळूर शहरी जिल्ह्यात नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. परंतु काही ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान बृह बेंगळूर महानगरपालिकेने (बीबीएमपी) कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन न केल्याबद्दल हॉटेल आणि इतर व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरू केली आहे.

कोरोना नियमांचे पालन न केल्याने बीबीएमपी अधिकाऱ्यांनी सुपरमार्केटसह पाच आस्थापने बंद केली आहेत. बीबीएमपीच्या म्हणण्यानुसार मल्लेश्वरममधील दोन, चामराजपेटमधील एक आणि आर. आर. नगरातील एक रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.

Related Stories

नववर्षाच्या आनंदोत्सवावर पडणार विरजन

Patil_p

राज्यात दिवसभरात 239 बाधितांचा बळी

Amit Kulkarni

बळ्ळारीमध्ये पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर सुरू

Archana Banage

कर्नाटकमध्ये २० लाखाहून अधिक चाचण्या

Archana Banage

ऑपरेशन कमळ : येडियुराप्पांच्या चौकशीला संमती

Amit Kulkarni

एकाच कुटुंबातील चौघांची गळफासाने आत्महत्या

Amit Kulkarni