Tarun Bharat

कोरोना फैलाव कमी, तरीही बळी जाणे सुरूच

प्रतिनिधी / पणजी

कोरोनाचे बळी चालूच असून गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी 5 जणांचा अंत झाल्यामुळे एकूण बळींचा आकडा 656 वर पोहोचला आहे. काल 109 नवे बाधित मिळाले तर 152 जण बरे झाले. सध्या 1813 एवढे सक्रीय रूग्ण असून ते विविध हॉस्पिटल-कोविड सेंटरात उपचार घेत आहेत.

 कोरोनाचे संशयित रूग्ण म्हणून 35 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले असून 72 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 54498 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 43029 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.

विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली-48, सांखळी-47, पेडणे-31, वाळपई-33, म्हापसा-66, पणजी-97, हळदोणा-21, बेतकी-39, कांदोळी-77, कासारवर्णे-14, कोलवाळ-67, खोर्ली-79, चिंबल-76, शिवोली-73, पर्वरी-84, मये-13, कुडचडे-29, काणकोण-33, मडगाव-139, वास्को-106, बाळ्ळी-31, कासावली-66, चिंचिणी-18, कुठ्ठाळी-80, कुडतरी-61, लोटली-28, मडकई-28, केपे-33, सांगे-31, शिरोडा-28, धारबांदोडा-31, फोंडा-149, नावेली-57.

  • 11 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण रूग्ण- 45498
  • 11 नोव्हेंबरपर्यंतचे बरे झालेले रूग्ण- 43029
  • 11 नोव्हेंबरपर्यंतचे सक्रीय कोरोना रूग्ण- 1813
  • 11 नोव्हेंबरचे नवीन रूग्ण- 109
  • 11 नोव्हेंबरचे बरे झालेले रूग्ण- 152
  • 11 नोव्हेंबरचे कोरोना बळी- 5
  • आतापर्यंतचे एकूण बळी- 656

Related Stories

एक एप्रिल पासून गोव्यात मद्याचे दर वाढणार

Tousif Mujawar

उत्तर गोव्यात अजून 54 बेकायदा ‘कर्लिज’?

Amit Kulkarni

वास्को-पाटणा रेल्वे मार्गावर उद्यापासून ‘हमसफर एक्स्प्रेस’

Omkar B

कला मंदिरमध्ये स्वरमैफलींची बरसात

Patil_p

मायनिंग ‘डंप’ निर्यातीला आता विरोध नको

Patil_p

ऐन उकाडय़ात इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद

Patil_p