Tarun Bharat

कोरोना बळींची मालिका सुरूच

Advertisements

मृतांचा आकडा 15 वर, 40 नवे रुग्ण

प्रतिनिधी \ बेळगाव

बेळगाव जिल्हय़ात कोरोना बळींची मालिका सुरूच आहे. सोमवारी आणखी दोघा जणांचा बळी गेला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 15 वर पोहोचली आहे तर सोमवारी 40 नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकूण बाधितांची संख्या 550 च्या घरात पोहोचली आहे.

बिम्स प्रशासनाने सोमवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार अथणी येथील एका 72 वषीय वृद्धाचा व कुलगोड, ता. गोकाक येथील 45 वषीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोघा जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगाव शहर, अथणी पाठोपाठ आता गोकाकमध्येही कोरोनाचा बळी पडला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून आयसीएमआरमधील प्रयोगशाळा बंद होती. सोमवारी स्वॅब तपासणी सुरू झाली असून रात्री आठ वाजेपर्यंत 400 हून अधिक अहवाल उपलब्ध झाले असून यामध्ये 40 जणांचे म्हणजेच 10 टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगाव शहरातील 9 व तालुक्मयातील 6 अशा 15 जणांचा यामध्ये समावेश आहे.

सदाशिवनगर, रामतीर्थनगर, कसाई गल्ली, नेहरूनगर, अशोकनगर येथील प्रत्येकी 1, न्यू गुड्सशेड रोड, महांतेशनगर येथील प्रत्येकी 2, चंदनहोसूर येथील 4, बेकिनकेरे येथील 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या कुडची, ता. रायबाग परिसरात आणखी 10 रुग्णांची भर पडली आहे.

रायबाग तालुक्मयातील 7, बैलहोंगल तालुक्मयातील 3, चिकोडी तालुक्मयात 1 व अथणी तालुक्मयात दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी रात्री हा अहवाल आरोग्य विभागाला उपलब्ध झाला आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

प्रयोगशाळेत सध्या 2 हजार 646 हून अधिक अहवाल प्रलंबित असून येत्या दोन ते तीन दिवसांत या सर्व संशयितांची तपासणी पूर्ण होण्याची शक्मयता आहे. तर जिल्हय़ातील 6 हजार 278 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरा 40 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये याचा उल्लेख नाही.

Related Stories

प्रलंबित विकासकामे दिवाळीनंतर पूर्ण करा

Omkar B

नागरिकांना वाढीव दराने पाणीपट्टी

Omkar B

यापुढे कोणत्याही महिलेचा अपमान खपवून घेणार नाही

Amit Kulkarni

तांगडी गल्ली अडकली समस्यांच्या विळख्यात

Amit Kulkarni

जिल्हय़ात वसती योजनेतील 7114 पैकी 191 घरांची कामे पूर्ण

Amit Kulkarni

दुचाकीची पिकअप वाहनास धडक : 2 ठार

Patil_p
error: Content is protected !!