Tarun Bharat

कोरोना बळीची संख्या वाढल्याने सर्वत्र चिंता

प्रतिनिधी / मडगाव

मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलचे कोविड हॉस्पिटलात रूपांतर केल्यापासून काल रविवारपर्यंत 44 जणांचे बळी गेले आहेत. उर्वरित 9 जणांचे बळी घरातच किंवा हॉस्पिटलात आणताना किंवा काहींचे गोमेकॉत बळी गेले आहे. कोरोनामुळे बळींची निरंतर वाढ होत असल्याने राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल बळी गेलेल्या पाच पैकी तीन पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.

मडगावच्या कोविड इस्पितळात काल रविवारी सकाळी 6.40 वाजता पहिल्या बळीची नोंद झाली ती हेडलँड सडा-वास्को येथील एका 72 वषीय व्यक्तीची. या व्यक्तीला 24 जुलै रोजी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तासाभरात म्हणजे 7.35 वा. जुवारीनगर-वास्को येथील एका 54 वषीय व्यक्तीची बळी गेला. त्यानंतर तीन तासांनी 10.30 वा. बायणा-वास्को येथील 45 वर्षीय महिलेचा बळी गेला. या महिलेला 25 जुलै रोजी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला न्युमोनिया झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

फोंडय़ातील पहिल्या बळीची नोंद

दुपारी 2 वा. दुर्भाट-फोंडा येथील 54 वर्षीय व्यक्तीचा बळी गेला. फोंडा तालुक्यातील हा पहिलाच बळी ठरला. दुर्भाट येथे कोरोनाचा फैलाव झाला असून या भागात कंन्टेमेन्ट झोन करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी ही व्यक्ती रहात होती. त्यानंतर अर्धातासाने म्हणजे 2.30 वा. न्यू वाडे-वास्को येथील 72 वर्षीय महिलेने कोविड हॉस्पिटलात अखेरचा श्वास घेतला.

या पूर्वी शनिवार दि. 25 जुलै रोजी कोविड हॉस्पिटलात एकाच दिवशी पाच जणांचे बळी गेली होते. त्याची पुनरावृत्ती काल रविवारी पुन्हा पाच बळींनी झाली. 25 जुलै रोजी गोमेकॉत एका 14 वर्षीय विद्यार्थिंनीचा कोरोनामुळे बळी गेला होता. 25 जुलै ते काल 2 ऑगस्ट या 9 दिवसांत आणखीन 18 बळींची नोंद झाली आहे.

मांगोर हिल-वास्को येथून कोरोनाचा फैलाव संपूर्ण राज्य भरात झाला. त्या वास्को शहराला व मुरगांव तालुक्याला कोरोनाने जबदरस्त दणका दिला असून आत्ता पर्यंत 27 जणांचे बळी घेतले आहेत. अद्यापही मुरगांव तालुक्यात कोरोना नियंत्रणात आलेला नाही.

दरम्यान, कोविड हॉस्पिटलातून काल दिवसभरात तिघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात एका लहान बाळाचा समावेश आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये दररोज 15 ते 20 रूग्ण नव्याने दाखल होत आहे.

Related Stories

गोव्याची पर्यटन ओळख पुसू देणार नाही

Omkar B

शेतकऱयांच्या प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष

Amit Kulkarni

मुरगाव हार्बर येथील चौगुले हाऊसजवळील दरड कोसळली

Amit Kulkarni

परराज्यातून येऊन आम्हाला जातीयवादाच्या गोष्टी सांगू नये- डॉ. प्रमोद सावंत

Patil_p

संचारबंदी धाब्यावर बसवून होंडय़ात आठवडी बाजार कसा?

Amit Kulkarni

कुंकळ्ळीतील डॉ. सतीश फळदेसाई यांचे निधन

Omkar B