प्रतिनिधी / शिरोळ
कोरोना बाधित व्यक्ती अथवा कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोण समाजाने बदलला पाहिजे सामाजिक बहिस्कर ही दुर्दैवी आहे. समाजाने सहानभूती देण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
येथील धन्वंतरी कोविड केअर सेंटरचा उद्घाटन समारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की खाजगी दवाखान्यांमध्येकोरोना बाधित रुग्णांची लूट केली जात आहे. शहरांमध्ये अत्याधुनिक असे कोविड केअर सेंटर स्थापन केल्यामुळे बाधित रुग्णांची होणारी गैरसोय टळवी आहे. या केअर सेंटरला आपण आपल्या परीने मदत करण्याचे आश्वासन त्यांनी शेवटी बोलताना दिले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत डॉ. अतुल पाटील यांनी केले प्रास्ताविक डॉ चेतन राजोबा यांनी करून शासनाच्या नियमाप्रमाणे बिल आकारण्यात येणार असून याठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे.
24 तास सेवा उपलब्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमास युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप राव पाटील डॉ अश्विनी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .शहरातील बारा डॉक्टरांनी एकत्र येऊन हे धन्वंतरी कोळी सेंटर सुरु करण्यात आले आहे.

