Tarun Bharat

कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींवर जि.प.चा वॉच

जि.प.मध्ये‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल’ यंत्रणा कार्यान्वित

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल’ च्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु आहे. बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेले लोक (फस्ट कॉन्टॅक्ट), त्यानंतर बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक पुढे किती व्यक्तींच्या संपर्कात आले (सेकंड कॉन्टॅक्ट), आणि दुसऱया टप्प्यातील लोक पुढे आणखी किती लोकांच्या संपर्कात आले (थर्ड कॉन्टॅक्ट) याची सर्व माहिती संकलित करण्याचे काम या यंत्रणे मार्फत केले जात आहे. संशयित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचेही याच पद्धतीने ‘कॉन्टॅक्ट  ट्रेसिंग’ केले जात आहे. या सेलमुळे जिल्हा प्रशासनास कोरोनाबाबतची सर्व माहिती जलद आणि एकत्रितरित्या मिळत आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईओ अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली 27 मार्चपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मदने यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी या सेलमध्ये कार्यरत आहेत. कोरोना बाधित, संशयित आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दररोज दिला जातो. सीपीआर, आयजीएम, इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांसह अन्य कोणत्याही रुग्णालयामध्ये कोणत्याही तालुक्यातील रुग्णाला घशातील स्त्राव घेण्यासाठी आणल्यानंतर त्याची माहिती  संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा तालुका आरोग्य अधिकाऱयांकडून   सेलकडे येते. ही सर्व माहिती संकलित करून ती जिल्हाधिकारी व सीईओंना दिली जाते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत आणि त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची याबाबतचे मार्गदर्शन सेलच्या माध्यमातूनच तालुक्यातील यंत्रणेला दिले जाते.

कोरोना संशयित व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत असल्यास त्यांची तपासणी करून त्यांना इन्स्टीटय़ुशन कॉरंटाईन करणे, तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरंटाइनचे शिक्के मारून त्यांना होम कॉरंटाइन करण्याच्या सूचना देणे आदी अनेक कामे या सेलच्या माध्यमातून केली जातात. घरगुती अलगीकरणासाठीच्या सूचनाही फोनवरुन दिल्या जातात. यासाठी दोन कर्मचारी कार्यरत आहेत. अहवाल पाठविण्यासाठी दोन कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे.

Related Stories

MPSC परीक्षा उत्तरतालिकांच्या हरकतींसाठी लागणार शुल्क

datta jadhav

जळगावात निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

datta jadhav

अवैध सुगंधी तंबाखू कारखान्यावर धाड; एकास अटक

Archana Banage

पालिकेच्या सभेला मुहूर्त, ५८ विषय अजेंड्यावर

Patil_p

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह

Archana Banage

कोरे फार्मसीमध्ये रॅगिंग,महिला लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या विषयीचे मार्गदर्शन

Archana Banage