Tarun Bharat

कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ‘टाटा ग्रुप’ कडून फाईव्ह स्टार ट्रीटमेंट!

ऑनलाइन टीम / मुंबई :

देशात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. अशा स्थितीतही डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जोखीम पत्करून काम करत आहेत. या डॉक्टरांना दिलासा देण्यासाठी टाटा कंपनीने पुढाकार घेतला आहे. 

टाटा सन्स मालकीच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ने मुंबईतील कोरोना ग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी आपल्या फाईव्ह स्टार हॉटेल्स मधील रूम उपलब्ध करून दिल्या आहेत. 

कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संसर्गाचा धोका असल्याने अशा डॉक्टरांना घरी जाता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांच्या निवासाची सोय करण्याचे आवाहन प्रशासनासमोर होते. मात्र, टाटा समूहाने हा प्रश्न आता दूर केला आहे. 

टाटा समूहाने एकूण सात हॉटेल डॉक्टरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ताज महाल पॅलेस, ताज सांताक्रुज, ताज लॅंड्स एंड, द प्रेसिडेंट, गिंगर एमआयडीसी अंधेरी, गिंगर मडगाव, गिंगर नोएडा या हॉटेलांचा समावेश आहे.

 दरम्यान या आधीही टाटा ट्रस्ट टाटा सन्स ने 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. टाटा समूहाचे चेअमन रतन टाटा यांनी एका निवेदनद्वारे ही घोषणा केली होती. 

Related Stories

तटस्थ विद्युत लोकपालसाठी वीज ग्राहक संघटनेचा आग्रह

Abhijeet Khandekar

राहुल गांधींचा वाढदिवस असा होणार साजरा

Archana Banage

यंदा 1 जूनला केरळात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता

Archana Banage

काँग्रेसच ठरल, ‘या’ महिन्यात होणार अध्यक्षपदाची निवडणूक

Archana Banage

बेपत्ता झालेल्या ‘त्या’ पाच तरुणांना चीनने दिले भारताच्या ताब्यात

datta jadhav

विमानतळाबाबत माजी पालकमंत्री सतेज पाटील “काय” म्हणाले वाचा

Kalyani Amanagi