Tarun Bharat

कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करणाऱयांचा गौरव

प्रतिनिधी/ सातारा

येथील कैलास स्मशान भूमी येथे कोरोनाच्या साथीत मृत पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार व इतर कार्य करणाया सातारा नगरपालिकेच्या कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.स्वामी समर्थ महिला बचत गट व सर्व कचरा वेचक श्रमिक संघ यांच्या वतीने सफाई कर्मचायांना सुरक्षा साधने बुट, मास्क, हातमोजे, सॅनिटाइझर, साबण यांचे वाटप  करण्यात आले.

 यावेळी बोलताना अध्यक्षा प्रतिभाताई जगताप म्हणाल्या, कोरोना या साथरोगात माणसाला माणसा जवळ जायला भीती वाटत असून या साथीत मृत पावलेल्या रुग्णांवर आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार व इतर कार्य करणाया सफाई कर्मचायांना खरी गरज असण्याचे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे जगदीप शिंदे  सूचित केले. त्यांनी सूचित केलेले बचतगटाच्या माध्यमातून कृतीतून आणले तसेच सर्व सफाई कर्मचायांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आले.

नगरपालिकेचे वाहक प्रेमचंद मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कैलास स्मशान भूमीचे व्यवस्थापक व कर्मचारी नगरपालिका सफाई कर्मचारी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, ओबीसी आरक्षणा शिवाय राज्यातील पालिका निवडणुका होणार

Abhijeet Khandekar

महाविद्यालये सुरू होण्याबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

Archana Banage

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Archana Banage

सातारा : ‘त्यांच्या’ प्रामाणिकपणामुळे सव्वा चार लाखाचे सोने मिळाले परत

Archana Banage

पूरग्रस्तांची घरे बांधून फेडरल बँकेने आदर्श उभा केला – मंत्री यड्रावकर

Archana Banage

गंभीर गुह्यातील नगरातला ‘बाळा’ तडीपार

Patil_p