Tarun Bharat

कोरोना बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू

आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू : कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 54 : आणखी दोघांना डिस्चार्ज

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात मंगळवारी कणकवली तालुक्यातील ओझरम येथील 60 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्हय़ात मृत्यू झालेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. तर आणखी दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 54 रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झालेला कोरोना बाधित रुग्ण हा 15 जून रोजी सदर रुग्ण मुंबई येथून आला होता व 20 जूनला दाखल झाला होता. तर 24 जून रोजी त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णास श्वसनदाहचा त्रास सुरू झाल्याने व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याशिवाय रेमडेसीवीर हे इंजेक्शनही देण्यात आले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चाकुरकर यांनी दिली. जिल्हय़ात यापूर्वी चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या चारही रुग्णांना विविध प्रकारचे आजार होते. मात्र पाचव्या रुग्णाला कोणतेही आजार नसताना कोरोनामुळेच मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्हय़ात आतापर्यंत कोरोना बाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू दर संपूर्ण राज्यात सर्वात कमी असून 1.10 एवढा आहे, अशीही माहिती देण्यात आली.

जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल कोरोना बाधित रुग्णांपैकी आणखी दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 214 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पाचजणांचा मृत्यू व एकजण उपचारासाठी मुंबईला गेला असल्याने सद्यस्थितीत कोविड-19 च्या 54 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तळेरे येथे विविध ठिकाणी कंटेनमेंट झोन

कणकवली तालुक्मयातील तळेरे येथील चाफर्डेवाडीमधील चंद्रकांत आत्माराम तळेकर यांचे घर ते प्रशांत जनार्दन पारकर यांचे घर हा संपूर्ण परिसर 34 घरे, 64 कुटुंबे व 259 लोकसंख्या, तळेरे बाजारपेठ येथील नीलेश अरविंद तळेकर यांचे घर ते बँक ऑफ महाराष्ट्र हा संपूर्ण परिसर, विश्वविद्या कॉम्प्लेक्स ते सूर्यकांत तळेकर यांचे घर आणि भांबुरे चाळ ते परशुराम महाडिक यांचे घर या संपूर्ण परिसरातील 95 घरे, 93 कुटुंबे व 339 लोकसंख्या तसेच तळेरे गावठाण येथील पारकर चाळ ते डॉ. सुखानंद भागवत दवाखाना या संपूर्ण परिसरातील 66 घरे, 85 कुटुंबे व 235 लोकसंख्या एकूण 500 मीटर परिघ एकूण 195 घरे, 252 कुटुंबे व 833 लोकसंख्या असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 12 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

वायंगणी-भंडारवाडी येथे कंटेनमेंट झोन

मालवण तालुक्मयातील वायंगणी-भंडारवाडीच्या 300 मीटर परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 10 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

पाठविण्यात आलेले एकूण नमुने 3824

अहवाल प्राप्त झालेले नमुने 3663

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 214

निगेटिव्ह आलेले नमुने 3449

अहवाल प्राप्त न झालेले नमुने 161

सद्यस्थितीत जिल्हय़ात कोरोना सक्रिय रुग्ण 54

अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 154

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5

विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 83

मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4425

संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 17250

शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 56

गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 14846

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2348

2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 116673

Related Stories

टॉवरच्या भाडय़ासाठी दूरसंचारकडे नाही पैसा

NIKHIL_N

डॉ. बी. एन. पाटील रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

Archana Banage

सावंतवाडीत अत्यावश्यक रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

नेमळे भीषण अपघातात कारमधील दोघे ठार

Anuja Kudatarkar

साटेली भेडशी येथील प्रा. आ. केंद्रात बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात

Anuja Kudatarkar

मिरजोळी-साखरवाडीत बंद पडल्या तब्बल 25 दुचाकी

Patil_p
error: Content is protected !!